शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:06 IST

सुमारे २५० लोकवस्तीच्या या पाड्यातील रहिवाशांना तीन किलोमीटरची पायपीट करीत ४०० मीटर खोल दरीत उतरून तेथील विहिरीवरून पाणी आणावे लागत होते

रमाकांत पाटीलनंदुरबार : गावात पाणी नसल्याने तरुणांचे विवाह होत नव्हते. अखेर मोठ्या कष्टाने गावकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेत गावात पाणी आणले. या पाण्याने गावाला जणू संजीवनीच दिली. तरुणांची रखडलेली लग्नं तर झालीच; पण रोज तीन किलोमीटर खोल दरीत जाऊन पाणी आणण्याच्या कष्टातूनही मुक्ती मिळाली. ही कहाणी आहे सातपुड्यातील नागझरी (ता. शहादा) येथील हाऱ्यापाडा गावची.

शहादा - तोरणमाळ रस्त्यावरच नागझरी गावाच्या उजव्या बाजूला उंच असा डोंगर असून, त्यावर हा पाडा वसला आहे. सुमारे २५० लोकवस्तीच्या या पाड्यातील रहिवाशांना तीन किलोमीटरची पायपीट करीत ४०० मीटर खोल दरीत उतरून तेथील विहिरीवरून पाणी आणावे लागत होते. गावात एखाद्याच्या घरी सुख - दु:खाचा कार्यक्रम असल्यास त्यासाठी त्या गावात ‘लाहे पद्धती’ची परंपरा सुरू होती. अर्थात ज्याच्याकडे कार्य असेल त्या घरी पाणी आणून देण्यासाठी संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती काम करत असे. दोन - दोन दिवस तेथे राबून पाणी आणले जाई. 

अनेक वर्षे पाण्याअभावी लग्ने रखडली गावातील पाणीटंचाईमुळे येथे लग्नासाठी कुणी मुलीही देत नव्हते. येथील मुलींची लग्नं जुळायची. पण, मुलांसाठी मात्र कुणी मुली देत नव्हते. त्यामुळे पाच-सात वर्षांपासून अनेक तरुणांचे लग्न रखडले होते. गावात पाणी येताच वर्षभरात तब्बल ११ तरुणांची लग्न जुळली.

‘समृद्ध किसान’ योजनेमुळे गावात आले पाणी‘बायफ’ संस्था व शासनाच्या ‘समृद्ध किसान’ प्रकल्पांतर्गत गावात पाणी योजना राबविण्यात आली. ज्या विहिरीवरून ग्रामस्थ पाणी आणत होते तिचे खोलीकरण करण्यात आले व सोलर पंप बसवून पाइपलाइन करून पाणी नेण्यात आले. स्वतंत्र टाकी बसवून गावात ठिकठिकाणी नळ बसवून पाणी आणण्यात आले. त्यासाठी गावाने तब्बल १५ दिवस श्रमदान केले. शासनाच्या या योजनेमुळे गावात आता भाजीपाला पिकवला जात आहे.

गावात पाण्याची सुविधा नसल्याने तीन किलोमीटर पायपीट करून खोल दरीतून पाणी आणावे लागत होते. गावात मुली द्यायला कुणी तयार नव्हते. आता पाणी आल्याने आम्ही सुखी झालो आहोत. - घनशा नाईक, हाऱ्यापाडा 

English
हिंदी सारांश
Web Title : Water arrives, transforming lives in remote Satpuda village.

Web Summary : Nagzhari villagers, facing water scarcity and marriage problems, found relief through the 'Samruddha Kisan' scheme. A well was deepened, a solar pump installed, and pipelines laid, bringing water and prosperity to Haaryapada. Eleven marriages took place in one year.
टॅग्स :Waterपाणी