Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:14 IST

Gold Silver Rate 29 April: लग्नसराईच्या हंगामाच्या धामधुमीत सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली.

Gold Silver Rate 29 April: लग्नसराईच्या हंगामाच्या धामधुमीत सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे खरेदीदारांच्या पदरी थोडी निराशा आली आहे. २४ कॅरेट सोनं आज ₹३९ नं महाग होऊन ₹१,४८,८२१ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. दुसरीकडे, चांदीच्या भावात ₹२,३७० ची मोठी उसळी नोंदवण्यात आली असून, ती ₹२,३८,९११ प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे विशेषतः लग्नाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे नवीन दर

आयबीजेएच्या ताज्या आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹३६ नं वधारून ₹१,३६,३२० प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये जीएसटी समाविष्ट नाही; जर ३% जीएसटी जोडला तर ही किंमत सुमारे ₹१,४०,४०९ पर्यंत पोहोचते. तसंच १८ कॅरेट सोनं देखील ₹२९ ने महाग होऊन ₹१,११,६१६ वर पोहोचलं असून, करासह याची किंमत सुमारे ₹१,१४,९६४ इतकी होते.

टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?

२३ आणि १४ कॅरेट सोन्यातही तेजी

सोन्याच्या इतर कॅरेटमध्येही दरवाढीचा कल कायम आहे. २३ कॅरेट सोनं ₹३९ नं वधारून ₹१,४८,२२५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. तसंच १४ कॅरेट सोने ₹२२ नं महाग होऊन ₹८७,०६० प्रति १० ग्रॅम झालं आहे. 

'ऑल टाइम हाय' पासून सोनं अजूनही स्वस्त

सध्या सोन्याचे दर त्याच्या ₹१,७६,१२१ या 'ऑल टाइम हाय' पेक्षा सुमारे ₹२७,३०० ने खाली आले आहेत. चांदी देखील तिच्या सर्वोच्च स्तरापेक्षा बरीच खाली व्यवहार करत आहे. अलीकडील जागतिक तणावाच्या काळाचा विचार केल्यास, आतापर्यंत सोनं सुमारे ₹१०,२७६ आणि चांदी ₹२८,९८९ ने स्वस्त झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Rise April 29: Check Latest Rates Before Buying

Web Summary : Gold and silver prices increased on April 29th. 24 Carat gold reached ₹1,48,821 per 10 grams, while silver surged to ₹2,38,911 per kg. The rise has caused concern, especially for wedding shoppers. Despite increases, gold is still cheaper than its all-time high.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसा