By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:18 IST
1 / 11राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला जामीन मंजूर झाला आहे. ११ मे २०२५ रोजी राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं होतं. २० मे २०२५ रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला गेले होते.2 / 11२३ मे रोजी राजा अचानक बेपत्ता झाला. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. यानंतर सोनमने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली, ९ जून २०२५ रोजी तिला अटक करण्यात आली. 3 / 11सोनमने आपला बॉयफ्रेंड राज कुशवाह याच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे. राज कुशवाह हा सोनमच्या वडिलांकडे कामाला होता. या प्रकरणात सोनमसह एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती.4 / 11सोनमला जामीन मिळाल्याचं समजताच राजाची आई उमा रघुवंशी या ढसाढसा रडल्या. त्यांच्या वेदनांचं रूपांतर आता रागात झाले असून थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, 'सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन.'5 / 11इतक्या गंभीर आरोपांनंतरही जामीन कसा मिळाला, हेच आपल्याला समजत नसल्याचं उमा रघुवंशी यांनी सांगितलं. 'माझा कायद्यावर पूर्ण विश्वास होता, पण आता वाटतं की कायद्यानेच डोळ्यावर पट्टी बांधली आहे' असंही म्हटलं.6 / 11या प्रकरणात पैशांचा मोठा खेळ झाला असून सोनमच्या कुटुंबातील लोक एकमेकांना मिळालेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हा व्यवहार शिलाँगपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला असला तरी या आरोपांची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.7 / 11उमा रघुवंशी यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला पोलीस पाठीशी होते, पण नंतर त्यांनी साथ सोडली, असं त्या म्हणाल्या. 'आरोपी मुलगी नसून मुलगा असता, तर कदाचित इतक्या लवकर जामीन मिळाला नसता,' असेही त्या म्हणाल्या. 8 / 11त्या पुढे म्हणाल्या की, त्या या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जातील आणि आपल्या मुलाला न्याय मिळेपर्यंत लढत राहतील. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.9 / 11राजाचे वडील अशोक रघुवंशी यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कायद्यावरचा विश्वास उडाल्याचं म्हटलं आहे. तर भाऊ सचिन रघुवंशी याने संताप व्यक्त करत टोला लगावला.10 / 11'कायद्याच्या डोळ्यावर पट्टी असते हे चित्रपटात ऐकलं होतं, पण आज खात्री पटली. कोणाला लवकर जामीन हवा असेल, तर त्यांनी शिलाँगला जावं' असं सचिनने म्हटलं आहे. कुटुंबियांना संताप व्यक्त केला. 11 / 11जामीन आदेशानुसार, अटक करताना आरोपीला कोणत्या कलमांतर्गत अटक केली जात आहे, याची स्पष्ट माहिती दिली गेली नव्हती. कागदपत्रांमध्ये अशा कलमाचा उल्लेख होता जे अस्तित्वातच नाही, तर हत्येशी संबंधित कलमाचा उल्लेखच केला गेला नव्हता.