कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान उद्या, बुधवारी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यातील १४२ जागांचे भवितव्य ठरणार असून, हा निकाल केवळ आमदारच निवडणार नाही, तर सत्ता कोणाची येणार हे देखील स्पष्ट करणार आहे.
तृणमूल काँग्रेस आपला दक्षिण बंगालचा बालेकिल्ला राखणार की भाजपला 'नबन्न' (सचिवालय) पर्यंतचा रस्ता सापडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघांत ९३ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे. येथे होणार मतदान या टप्प्यात उत्तर-२४ परगणामध्ये ३३ जागा, दक्षिण-२४ परगणातील ३१, हावडातील १६, नदिया १७, हुगळी १८ व पूर्व बर्धमानमधील १६ कोलकात्यातील ११ जागांचा समावेश आहे.
द. बंगाल: सत्तेचा मुख्य मार्गराजकीय समीक्षकांनुसार, दक्षिण बंगाल जिंकल्याशिवाय बंगालची सत्ता मिळवणे अशक्य आहे. २०२१ च्या निवडणुकीत या १४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने १२३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ १८ जागा मिळाल्या होत्या.
३.२१ कोटी मतदारदुसऱ्या टप्प्यात आज ३.२१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १.६४ कोटी पुरुष व १.५७ कोटी महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८-१९ वर्षांचे ४.१२ लाख नवमतदार यंदा मतदान करतील. राज्यात सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावला असला तरी राजकारण तापलेले आहे.
मतदार यादीतील नावे वगळण्यावरून वादया निवडणुकीत 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन'मुळे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली आहेत, जो चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. ज्यामुळे निकालात मोठी उलथापालथ होऊ शकते.
प्रचारातील मुख्य मुद्देभ्रष्टाचार, घुसखोरी, निवडणूक पश्चात हिंसाचार आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार केला. गृहमंत्री अमित शाह यांनी मतदानानंतर ६० दिवस केंद्रीय दले बंगालमध्येच राहतील, असे आश्वासन सोमवारी मतदारांना दिले आहे.
Web Summary : West Bengal's second phase of voting decides 142 seats, crucial for power. TMC defends its southern stronghold against BJP. 3.21 crore voters participate. Key issues include corruption and women's safety. High voter turnout expected, potentially reshaping the political landscape.
Web Summary : पश्चिम बंगाल में दूसरे चरण का मतदान 142 सीटों का फैसला करेगा, जो सत्ता के लिए महत्वपूर्ण है। टीएमसी भाजपा के खिलाफ अपने दक्षिणी गढ़ की रक्षा कर रही है। 3.21 करोड़ मतदाता भाग लेंगे। भ्रष्टाचार और महिलाओं की सुरक्षा जैसे प्रमुख मुद्दे हैं। उच्च मतदान की उम्मीद, संभावित रूप से राजनीतिक परिदृश्य को नया आकार दे सकता है।