घरातील पाळीव मांजरीला त्रास दिला म्हणून एका महिलेने आपल्या मुलाला दिलेल्या अजब शिक्षेचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर वादाचा विषय ठरला नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी आईच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर, काही जणांनी याला अतिरेकी कृत्य असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाने घरातील मांजरीला त्रास दिल्याचे समजल्यानंतर त्याच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या महिलेने आपल्या मुलाला त्याचा महागडा गेमिंग कन्सोल प्लेस्टेशन ५ हे स्वतःच्या हाताने फोडण्याची शिक्षा दिली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगा आईच्या सांगण्यावरून त्याचा आवडता गेमिंग कन्सोल वारंवार जमिनीवर आदळताना दिसत आहे. हे सर्व करताना मुलगा रडतही आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार महिलेने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
अनेकांच्या मते, मुलाला शिस्त लावणे गरजेचे आहे, परंतु अशा प्रकारे सार्वजनिक अपमान करणे आणि महागड्या वस्तूची नासधूस करायला लावणे हे मुलाच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम करू शकते. एका व्यक्तीने म्हटले आहे की, मांजरीला त्रास देणे किंवा मारहाण करणे चुकीचेच आहे, पण मुलाला अशा प्रकारे शिक्षा देणे ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. याउलट काही लोकांनी महिलेच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांचे मत आहे की, प्राण्यांशी क्रूरपणे वागणाऱ्या मुलाला अशाच कडक शिक्षेची गरज असते, जेणेकरून त्याला दुसऱ्याच्या वेदनांची किंमत कळेल.
तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
तज्ज्ञांच्या मते, मुलांनी प्राण्यांना त्रास दिल्यास त्यांना समजावून सांगणे किंवा त्यांचे कन्सोल काही काळासाठी काढून घेणे ही योग्य पद्धत असू शकते. मात्र, त्यांना हिंसक रितीने वस्तू फोडायला लावणे आणि त्याचे व्हिडिओ बनवून ते सार्वजनिक करणे यामुळे मुलांमध्ये राग आणि सूडाची भावना निर्माण होऊ शकते.
Web Summary : A viral video shows a mother forcing her son to destroy his PlayStation 5 as punishment for harming their cat. The act has sparked debate online, with some supporting the disciplinary action and others criticizing it as excessive and potentially damaging to the child's mental health.
Web Summary : एक वायरल वीडियो में एक माँ अपने बेटे को बिल्ली को नुकसान पहुंचाने की सजा के तौर पर उसका प्ले स्टेशन 5 तोड़ने के लिए मजबूर करती है। इस कृत्य ने ऑनलाइन बहस छेड़ दी है, कुछ लोग अनुशासनात्मक कार्रवाई का समर्थन कर रहे हैं जबकि अन्य इसे अत्यधिक और बच्चे के मानसिक स्वास्थ्य के लिए संभावित रूप से हानिकारक बता रहे हैं।