शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
5
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
6
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
7
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
8
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
10
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
11
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
12
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
13
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
16
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
17
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
18
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
19
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
20
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:03 IST

'एसडीएम मॅडम' लोकांमध्ये 'मॅडम कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध झाली.  यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बरेलीच्या गल्लीबोळातून आलेल्या एका मुलीने असं स्वप्न पाहिलं, जे देशातील लाखो तरुणांच्या डोळ्यांत असतं. आयएएस (IAS) होण्याचं स्वप्न, ज्यासाठी लोक आपलं आयुष्य पणाला लावतात. तिनेही तेच केलं. आठ वर्ष पुस्तकं, नोट्स, कोचिंग आणि मॉक टेस्टमध्ये घालवली, पण यश मिळालं नाही. जेव्हा ती UPSC परीक्षेत यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने स्वतःसाठीच एक नवी ओळख निर्माण केली. तिने 'एसडीएम' (SDM) असल्याचं खोटं सांगायला सुरुवात केली. हळूहळू ही 'एसडीएम मॅडम' लोकांमध्ये 'मॅडम कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध झाली.  यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महागडी लक्झरी SUV, व्हीआयपी स्टाईल, सरकारी अधिकाऱ्यांसारखं वागणं आणि प्रचंड आत्मविश्वासाने ती फिरू लागली.  तिची एन्ट्री एखाद्या फिल्मी सीनपेक्षा कमी नसायची. SUV थांबायची, दरवाजा उघडायचा आणि 'मॅडम' बाहेर पडायच्या. आसपासचे लोक आदराने उभे राहायचे. काही जण सलाम करायचे, तर काही जण रस्ता मोकळा करून द्यायचे. लोक प्रश्न न विचारता तिच्यावर विश्वास ठेवू लागले. समोर बसलेल्या महिलेकडे ताकद आहे, पोहोच आहे आणि यंत्रणा चालवण्याची क्षमता आहे, असं प्रत्येकाला वाटायचं.

लोकांमध्ये निर्माण केला दरारा

हळूहळू तिच्या बँक खात्यात रक्कम वाढत गेली. तिने आपल्या ज्ञानाचा वापर एक खोटी ओळख निर्माण करण्यासाठी केला. बरेलीच्या बारादरी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रीन पार्क कॉलनीतील राहणाऱ्या विप्रा हिची ही गोष्ट आहे. विप्राने २०१२ ते २०२० या काळात नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. UPSC मध्ये अपयश आल्यावर, विप्राने स्वतःला आधी एसडीएम आणि नंतर गजरौला येथे तैनात असलेली एडीएम (ADM - FR) सांगून लोकांमध्ये दरारा निर्माण केला.

सरकारी नोकरी लावण्याचं आमिष 

विप्राची पद्धत अत्यंत चलाख होती. ती आधी तरुणांशी मैत्री करायची, मग त्यांना सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवायची. तिच्या बोलण्याने आणि अधिकारी थाटाने प्रभावित होऊन अनेक लोक तिच्या जाळ्यात अडकले. नोकरीच्या आशेने त्यांनी लाखो रुपये तिला दिले. यासाठी विप्राने पूर्ण यंत्रणा तयार केली होती. नियुक्ती पत्रं आणि इतर सरकारी कागदपत्रं लखनौमधील सरकारी कार्यालयांजवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमधून कुरिअर केली जात असत. यामुळे पीडितांना खात्री पटायची की, आपली कागदपत्रे खरोखरच सरकारी विभागातून आली आहेत.

५ लाख २१ हजार रुपये उकळले

विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तिने एका पीडिताच्या खात्यात १७ हजार रुपये 'पगार' म्हणून ट्रान्सफरही केले. त्यानंतर त्या तरुणाचा पूर्ण विश्वास बसला की आपल्याला नोकरी मिळाली आहे आणि पगारही सुरू झाला आहे. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा किला परिसरातील मुसाहिद नावाच्या तरुणाने तक्रार दाखल केली. मुसाहिदकडून कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली ५ लाख २१ हजार रुपये उकळण्यात आले होते. बराच काळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने त्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

खात्यांमध्ये ५५ लाख सापडले

या कारवाईत पोलिसांनी विप्रा, शिखा आणि दीक्षा यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लक्झरी कार जप्त करण्यात आली आहे, ज्यावर 'ADM' लिहिलं होतं. याशिवाय १० पेक्षा जास्त चेकबुक, दोन लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि विविध बँक खात्यांमध्ये जमा असलेले सुमारे ५५ लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांनी ही सर्व खाती फ्रीज केली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake 'Madam Collector' exposed: Luxury car, ₹55 lakh fraud.

Web Summary : A woman posing as a government official in Bareilly defrauded youths of lakhs, promising jobs. Police seized a luxury car, ₹55 lakh, and arrested three. She impersonated an SDM/ADM, gaining trust before taking money.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक