शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:15 IST

IMDb Free Movies Play Trick: मोफत चित्रपट, वेब सिरीज बघण्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, सध्या सुरू असलेल्या IMDb स्कॅमबद्दल जाणून घ्या आणि सावध व्हा. 

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, एका साध्या ट्रिकने तुम्ही IMDb वरील कोणताही सशुल्क चित्रपट किंवा वेब सीरिज मोफत पाहू शकता. मात्र, हा कोणताही अधिकृत मार्ग नसून नेटकऱ्यांना जाळ्यात ओढण्याचा एक खतरनाक सापळा असू शकतो.

नेमकी काय आहे ही 'IMDb Play Trick'?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, तुम्हाला जो चित्रपट पाहायचा आहे, त्याचे नाव IMDb वर सर्च करायचे असते. त्यानंतर त्या चित्रपटाच्या यूआरएल (URL) मध्ये बदल करायचा असतो. उदाहरणादाखल, जर लिंक www.imdb.com/title/... अशी असेल, तर त्यात बदल करून ती www.playimdb.com/title/... अशी करायला सांगितली जाते. असे केल्यावर तो चित्रपट खरोखरच प्ले व्हायला लागतो, असा दावा केला जातो.

हा 'जुगाड' का धोकादायक आहे?

वरवर पाहता ही ट्रिक काम करत असल्याचे दिसत असले, तरी त्यामागील सत्य अतिशय भीतीदायक आहे:

१. खोट्या वेबसाईटचा वापर: playimdb.com ही कोणतीही अधिकृत वेबसाईट नसून ती एक बनावट (Fake) वेबसाईट आहे. जेव्हा तुम्ही मूळ IMDb लिंकमध्ये बदल करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात एका असुरक्षित आणि अनोळखी सर्व्हरवर पोहोचता.

२. व्हायरसचे धोके : अशा प्रकारच्या अनधिकृत वेबसाईटवर तुमचे खाजगी तपशील चोरीला जाण्याची मोठी भीती असते. एकदा तुम्ही अशा लिंकवर क्लिक केले की, तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर किंवा व्हायरस शिरण्याची शक्यता असते.

३. पायरेसी आणि बेकायदेशीर कृत्य: हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून पायरेसीला प्रोत्साहन देणारा आहे. अशा वेबसाईटवर चित्रपट पाहणे हे सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकते.

४. बँकिंग फ्रॉडची शक्यता: अनेकदा अशा वेबसाईट तुमची ओळख चोरून तुमच्या बँकिंग व्यवहारांवर देखील डल्ला मारू शकतात. सायबर तज्ञांच्या मते, केवळ यूआरएलमध्ये फेरफार करून चित्रपट दाखवणाऱ्या वेबसाईट या 'फिशिंग' (Phishing) करण्यासाठी तयार केलेल्या असतात.

काय काळजी घ्याल?

शॉर्टकट टाळा: मोफत चित्रपट पाहण्याच्या नादात कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा: जर तुम्हाला चित्रपट पाहायचे असतील, तर नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ किंवा हॉटस्टार यांसारख्या अधिकृत ॲप्सचाच वापर करा.

यूआरएल नीट तपासा: कोणत्याही वेबसाईटवर जाण्यापूर्वी त्याची स्पेलिंग आणि 'https' सुरक्षितता तपासा.

"फुकट ते पौष्टिक" या म्हणीनुसार मोफत चित्रपट पाहण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो, पण तो मोह तुमच्या सायबर सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे अशा 'प्ले आयएमडीबी' (PlayIMDb) सारख्या ट्रिकपासून लांब राहा आणि स्वतःला सायबर ठगबाजांपासून वाचवा. 

English
हिंदी सारांश
Web Title : IMDb Free Movie Trick: Beware of this costly scam!

Web Summary : A viral IMDb movie trick promising free films leads to fake websites and potential malware. It risks data theft, banking fraud and promotes piracy. Use official platforms and verify URLs to stay safe from cyber scams.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcinemaसिनेमाWebseriesवेबसीरिजInternetइंटरनेटFake Newsफेक न्यूजonlineऑनलाइनfraudधोकेबाजी