शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 00:29 IST

दोसरभवन चौकाजवळील डेटोनेटर्स ठेवल्याचा तथाकथित ‘डीएसएस’ संघटनेचा दावा...

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल येथील मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला आहे. संबंधित पत्र नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पाठविण्यात आले होते. ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने हे पत्र पाठविले असून त्यात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचादेखील प्रयोग करण्यात आला आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली असून ‘एटीएस’नेदेखील सर्व ठिकाणी सखोल तपासणी सुरू केली आहे.२७ एप्रिल रोजी पोस्टाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कार्यालयात संबंधित निनावी पत्र आले. इंग्रजी भाषेतील संबंधित पत्र ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने पाठविल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, मेट्रो या ठिकाणी ‘सिझीयम-१३७’ ही ‘रेडिओॲक्टिव्ह’ पावडर टाकल्याचे लिहिण्यात आले होते. संबंधित पावडर ही प्रचंड विनाशकारी असून त्यामुळे अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी ऑरेंज आणि ॲक्वा लाइनवरील मेट्रो गाड्यां तसेच भाजप-संघ कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या आपली बसमध्येदेखील ‘सिझीयम-१३७’ ही पावडर टाकल्याचा दावा केला. आम्ही मेट्रोच्या सीट्सवर पावडर टाकली आहे असे त्यात नमूद आहे. आम्हाला कॅन्सर इस्पितळातून ही पावडर मिळाली. संपूर्ण नागपूरच आता ‘रेडिएशन’च्या धोक्यात असून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील तज्ज्ञांकडून तपासणी केल्यावर यातील सत्यता तुम्हाला लक्षात येईल, असेदेखील आरोपींनी लिहिले आहे.

खोडसाळपणा की जाणूनबुजून दिलेली धमकी?या पत्रामुळे खळबळ उडाली. तातडीने एटीएसचे पथकदेखील पोहोचले. पत्रात नमूद केलेल्या संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, भाजपचे गणेशपेठ येथील कार्यालय, मेट्रो स्थानक इत्यादी जागांवर जाऊन एटीएसच्या पथकाने एनडीआरएफ व अणुऊर्जातज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी केली. मात्र, कुठेही काहीही आढळले नाही. या प्रकरणात एटीएसच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे की जाणूनबुजून दिलेली धमकी आहे याचा तपास सुरू आहे.

स्फोटके ठेवल्याचा दावा, आता तर खरा खेळ सुरू -काही दिवसांअगोदर दोरसभवन मेट्रो स्थानकाच्या मागील डॉ. उज्ज्वल लांजेवार यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून डेटोनेटर्स व जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. ही स्फोटकेदेखील आम्हीच ठेवली होती व हा केवळ इशारा आहे. खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Radioactive threat to RSS HQ; Anonymous letter sparks investigation.

Web Summary : An anonymous letter threatened Nagpur with radiation, claiming radioactive material was planted at RSS headquarters and other locations. Police and ATS investigated, finding nothing. A prior explosives discovery was also claimed.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliceपोलिसnagpurनागपूर