शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भोरला ३५० उमेदवारी अर्जांची विक्री

By admin | Updated: July 13, 2015 23:45 IST

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर, ८ अर्ज आॅनलाईन भरण्यात आले.

भोर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर, ८ अर्ज आॅनलाईन भरण्यात आले. मात्र, एकच अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली.भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५०० जागा, तर ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीतील ८८ रिक्त जागा अशा एकूण ११८ ग्रामपंचायतींच्या ५८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. २० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यावर तो निवडणुक अधिकाऱ्यांना दाखवायचा आहे. त्या अर्जासोबत उमेदवाराला विविध प्रकारची घोषणापत्रे, प्रतिज्ञापत्र व दाखले जोडावे लागणार आहेत. हे दाखले न जोडल्यास उमेदवारी अर्ज बाद होणार असल्याने ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी अनेक गावांच्या इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. यामुळे भोर शहरातील टायपिंग व झेरॉक्सच्या दुकानात तसेच सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ७ सदस्यांचे ४६२; तर वेळू, नसरापूर व उत्रौली ग्रामपंचायतींचे प्रत्येकी ९ सदस्य याप्रमाणे २७ तर भोलावडे ग्रामपंचायतीचे ११ सदस्य असे एकूण ५०० जागा व पोटनिवडणूक होणाऱ्या ८८ जागा अशा एकूण ५८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.शिक्षक भवन येथे निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज देण्यासाठी विक्री कक्ष व मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच, चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी केवळ एकाच उमेदवाराने आॅनलाईन अर्ज भरून दिला. अर्ज भरण्याबाबत कोणाला अडचणी असल्यास त्याची महिती दिली जाईल, असे तहसीलदार वर्षा शिंगणे-पाटील व नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)