Baramati bypoll election 2026: बारामतीत ‘पवार पर्व’ अजिंक्यच! १९६७ पासून सलग वर्चस्व; सुनेत्रा पवारांच्या विक्रमी विजयाचा नवा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:27 IST2026-05-04T18:26:26+5:302026-05-04T18:27:51+5:30

Baramati bypoll election 2026 बदलत्या राजकीय समीकरणांमध्येही येथे पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहणे, हीच या मतदारसंघाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे

Baramati bypoll election 2026 'Pawar Parv' is unbeatable in Baramati! Continuous dominance since 1967; New history of Sunetra Pawar's record victory | Baramati bypoll election 2026: बारामतीत ‘पवार पर्व’ अजिंक्यच! १९६७ पासून सलग वर्चस्व; सुनेत्रा पवारांच्या विक्रमी विजयाचा नवा इतिहास

Baramati bypoll election 2026: बारामतीत ‘पवार पर्व’ अजिंक्यच! १९६७ पासून सलग वर्चस्व; सुनेत्रा पवारांच्या विक्रमी विजयाचा नवा इतिहास

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात १९६७ पासून सुरू झालेले ‘पवार पर्व’ आजतागायत अबाधित राहिले असून, तब्बल सहा दशकांहून अधिक काळ या मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम आहे. यंदाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी २ लाख १८ हजार ९३० मताधिक्क्याने विजय मिळवत या परंपरेला नवे शिखर गाठून दिले.

या राजकीय प्रवासाची सुरुवात १९६७ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विजयाने झाली. काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी बाबालाल काकडे यांचा पराभव करत बारामतीच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली. त्यानंतर १९७२, १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० अशा सलग निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. या काळात त्यांनी विविध पक्षांतून निवडणुका लढवत प्रत्येकवेळी मतदारांचा विश्वास संपादन केला.

१९९१ मध्ये शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची सूत्रे अजित पवार यांच्या हाती आली. पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि पुढील निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत बारामतीवर आपली मजबूत पकड सिद्ध केली.

विशेषतः २०१४ आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मताधिक्क्याची आकडेवारी लक्षणीयरीत्या वाढताना दिसली. २०१४ मध्ये त्यांनी सुमारे ८९ हजार मताधिक्क्याने विजय मिळवला, तर पुढील निवडणुकीत हे मताधिक्क्य १.६५ लाखांपर्यंत पोहोचले. पवार कुटुंबातील अंतर्गत राजकीय संघर्षानंतरही मतदारांनी अजित पवार यांच्यावर विश्वास कायम ठेवला. २०२६ मध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना महायुतीसह महाविकास आघाडीचाही पाठिंबा मिळाला. या व्यापक राजकीय एकजुटीमुळे त्यांनी तब्बल २.१८ लाख मताधिक्क्याने विजय मिळवत बारामतीच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम नोंदवला.

सहा दशकांहून अधिक काळ चालत आलेल्या या ‘पवार पर्वा’मुळे बारामती हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान राखून आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्येही येथे पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहणे, हीच या मतदारसंघाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे.

Web Title : बारामती उपचुनाव: पवार वंश अपराजेय; सुनेत्रा पवार की ऐतिहासिक जीत।

Web Summary : बारामती में 1967 से पवार परिवार का दबदबा जारी है। सुनेत्रा पवार ने 2026 के उपचुनाव में 2.18 लाख वोटों के अंतर से रिकॉर्ड जीत हासिल की, जो अजित पवार के निधन के बाद परिवार की विरासत को आगे बढ़ा रही है। यह जीत बारामती के राजनीतिक इतिहास में एक नया अध्याय है।

Web Title : Baramati Bypoll: Pawar Dynasty Unbeaten; Sunetra Pawar's Historic Victory.

Web Summary : The Pawar family's dominance in Baramati continues since 1967. Sunetra Pawar secured a record victory in the 2026 bypoll with a 2.18 lakh vote margin, extending the family's legacy after Ajit Pawar's passing. This win marks a new chapter in Baramati's political history.