शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

'True caller'वर केंद्रीय अधिकाऱ्यांचे नाव ठेवून पुण्यात उच्च अधिकाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 20:50 IST

मेट्रो कंत्राटदारांना ठकवून लुबाडण्याचा संशय, दोन गुन्हे दाखल

ठळक मुद्देपीएमआरडीएचे आयुक्त यांना वारंवार फोन करुन फसवण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्रीय नागरी विकास मंत्रालयातील सचिव असल्याचे सांगून मोबाईलवरील ट्रु कॉलरवर त्यांचे नाव ठेवून पीएमआरडीएचे आयुक्त आणि महा मेट्रोचे कार्यकारी संचालक यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तर महाराष्ट्र मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिहाडे यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

गौतम बिहाडे हे त्यांच्या महाराष्ट्र मेट्रो कार्यालयात असताना २६ डिसेंबर रोजी त्यांना एक फोन आला. त्यावर समोरच्याने मी दुर्गा शंकर मिश्रा सचिव गृह निर्माण मंत्रालय व नागरी बोलतो आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या ट्रॅ प्लिंथ कंत्राटदार यांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांना माझ्याशी बोलायला सांगा व त्यांचा नंबर मला द्या, असे त्यांनी बिहाडे यांना सांगितले. त्यांनी हे कंत्राटदार आपल्या नाही तर रवीकुमार यांच्या अधिपत्याखाली काम करीत असल्याचे सांगितले. बिहाडे यांच्या मोबाईलवरील ट्रु कॉलरवर दुर्गा मिश्रा असे नाव दिसत होते. पण इतका मोठा अधिकारी आपल्याला कसा फोन करेल, अशी शंका आल्याने त्यांनी ही बाब व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना सांगितले. तेव्हा त्यांनी दुर्गा मिश्रा यांचा हा नेहमीचा नंबर दिसत नाही. त्यांचे व्हॉटसॲप प्रोफाईल चेक केल्यावर सेक्रेटरी दुर्गा मिश्रा व फोन नंबर कोलकत्ता असे दिसत होते. त्यानंतर त्यांना या नंबरवरुन दोन तीनदा कॉल आले. तेव्हा दीक्षित यांच्या सांगण्यावरुन त्यांनी ते व्हॉईस रेकाॅर्ड केले. त्यावर दीक्षित यांनी हा आवाज मिश्रा यांचा नसल्याचे सांगितले. मिश्रा यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कळविल्यावर त्यांनी तक्रार देण्यास सांगितले. त्यावरुन आरोपी हा मेट्रोचे कंत्राटदारांना ठकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने दुर्गा शंकर मिश्रा यांचे नावाचा वापर करुन त्यांचा फोटो व्हॉटसॲप प्रोफाईलवर ठेवून टु कॉलरवर त्यांच्या नावाची नोंद करुन ठकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

याचप्रमाणे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना वारंवार फोन करुन फसवण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुहास दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.सुहास दिवसे यांनी सांगितले की, एक जण स्वत: ला केंद्रीय सचिव मिश्रा असल्याची बतावणी करुन आपल्याला फोन करीत होता. त्या नंबरची खात्री केल्यावर तो बनावट असल्याचे लक्षात आले. महा मेट्रोच्या कंत्राटदारांकडून गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने संशयिताने वारंवार फोन केल्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
...........

ट्रु कॉलरवरील आयडेंटिटी नेहमीच खरी नसते...
आपल्याला एखाद्या अनोळखी नंबरवरुन फोन आला की आपण ट्रु कॉलरवर त्याचे नाव पहातो. त्याच्याकडून फोन आल्याचे खरे मानतो. पण प्रत्येक वेळी ट्रु कॉलरवरील अंडेंटिटी खरी असतेच असे नाही. जेव्हा एखादे नवीन सीमकार्ड घेतले जाते व ते मोबाईलमध्ये टाकून तो नंबर ज्या नावाने सेव्ह केला जातो. ते नाव ट्रू कॉलरवर सेव्ह होते व नंतर ज्यांना त्या नंबरवरुन कॉल जातो, त्यांना त्या नावाच्या व्यक्तीने फोन केला असे वाटते. त्यामुळे फसवणुक करण्याच्या उद्देशाने एखाद्याने ट्रु कॉलरवर बनावट नावाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ट्रु कॉलरवरील ओळख ही नेहमीच खरी असते असे नाही. त्यामुळे लोकांनी त्याची खात्री करावी. मगच्या त्यांच्याशी व्यवहार करावा.

मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक,

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी