शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाला अडवून ५ जणांनी त्याच्यावर काेयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाला अडवून ५ जणांनी त्याच्यावर काेयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार जांभुळवाडी येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

किरण कैलास इंगळे (वय २२), शेखर अंकुश दिघे (वय २०) आणि जय पांडुरंग निकम (वय २१, तिघे रा. विठ्ठलनगर, जांभुळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भाऊ चोरघे आणि रवी इंगळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अजित ओंबासे (वय ३४, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ अमर ओंबासे हा दुचाकीवरुन रविवारी पहाटे मार्केटयार्ड येथे कामाला जात होता. त्यावेळी जांभुळवाडी रोडवरील लिपाणे वस्ती येथे पाच जण कारमधून आले. त्यांनी अमर याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. अमर हा एका महिलेबरोबर बोलत असल्याच्या संशयावरुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, दोन्ही हाताचे मनगटावर, पाठीवर सपासप वार केले. त्यात अमर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.