शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या भांडणावरुन तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

पुणे : दिवाळीत झालेल्या भांडणावरुन सहा जणांनी तरुणावर पालघनने वार करुन त्याला जबर जखमी केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सहा ...

पुणे : दिवाळीत झालेल्या भांडणावरुन सहा जणांनी तरुणावर पालघनने वार करुन त्याला जबर जखमी केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सहा जणांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

भैय्या, अजय निकाळजे, दीपक गायकवाड, नितीन निकाळजे, अक्षय कांबळे, अभिजित कांबळे व इतर चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी साईराज राणाप्रताप लोणकर (वय २१, रा. कोंढवा खुर्द) याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना तानाजी लोणकर यांच्या ऑफिसजवळ रविवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि नितीन निकाळजे यांच्या गाडी पार्क करण्यावरुन १३ नोव्हेंबर रोजी वाद झाला होता. तेव्हा लोणकर याने निकाळजेवर कोयत्याने वार केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी लोणकर याला अटक केली होती. रविवारी दुपारी सव्वाचार वाजता फिर्यादी हा तानाजी लोणकर यांच्या ऑफिसजवळ थांबला असल्याची माहिती आरोपींना मिळाली. भैय्या याने लोणकर याच्या डोक्यात पालगनने वार केले. अजय निकाळजे याने ही त्यांच्याकडील पालगनने लोणकर याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी याने तो त्याच्या हातावर झेलला. अजय निकाळजे याने पालघन हवेत फिरवत मी इथला भाई आहे, तुला कोण वाचवितो ते बघतोच, असे म्हणून जोरजोरात ओरडून दहशत पसरविली. त्यानंतर आरोपी पळून गेले. लोणकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वारामुळे त्याच्या उजव्या तळहातावर जखम होऊन ८ टाके पडले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, निलेश चव्हाण, पी़ यु़ कापुरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.