शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

RTE नुसार खाजगी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; पालक वर्गात आनंदाचे वातावरण

By प्रशांत बिडवे | Updated: July 19, 2024 14:58 IST

विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा

पुणे: आरटीई (RTE) अंतर्गत खाजगी शाळांत २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेशासंदर्भात जून महिन्यात काही खाजगी शाळानी उच्च  न्यायालयात दाखल याचिकेमुळे मागील दीड महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. राज्य शासनाने आरटीई प्रवेशा संदर्भात दि. ९ फेब्रुवारी रोजी काढलेली अधिसूचना तसेच त्यानंतरचे शासन निर्णय  मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दि.१९ रोजी रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये सामाजिक व आर्थिक, वंचित घटकातील मुलांसाठी २५ टक्के आरक्षण दिले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात २०१२ पासून सुमारे सात लाख मुलांना लाभ मिळाला परंतु महाराष्ट्र शासनाने वेळेवर शुल्क प्रतिपूर्ती केली नाही त्यामुळे शिक्षण संस्था व पालक यांच्यात सातत्याने वाद होत होते.

दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून प्रवेश प्रक्रियेत बदल केले. त्यामुळे सर्व विद्यार्थी सरकारी शाळेत जातील व विना अनुदानित शाळेत २५ टक्के मोफत शिक्षणाची सवलत कोणालाही मिळणार नाही. त्यामागे राज्य शासनाला शुल्क प्रतिपूर्तीची कोणतीही जबाबदारी घ्यायला लागू नये हा उद्देध होता. सदर अधिसूचना शिक्षण हक्क कायद्याचा भंग असून, सामाजिक न्याय विसर पडल्याचे अधोरेखित करीत अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने तसेच मुव्हमेट फॉर पीस अँड जस्टीस या संस्थेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दि.१९ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची व पालकांची भूमिका मान्य केली. आणि ९ फेब्रुवारीची अधिसूचना व त्या नंतरचे शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. तसेच विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे.

न्यायालयाचा निर्णयामुळे भारतीय संविधान तसेच सामाजिक न्यायातील मूल्यांचा विजय झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने तातडीने येत्या १५ दिवसात आरटीई ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. - डॉ. शरद जावडेकर, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा

 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSocialसामाजिक