शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

मांडुळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, ५० लाखांचे दोन मांडुळ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:14 PM

पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने अंधश्रद्धेला बळी पडून जिवंत मांडुळांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत.

पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने अंधश्रद्धेला बळी पडून जिवंत मांडुळांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी ग्राहक असल्याचे भासवून त्यांना ताब्यात घेतले. गणेश वाफगावकर (वय १८, रा. नसरापूर, ता. भोर) आणि राजू बबन शिळीमकर (वय ४०, रा. मु़ पो. कुरंगवळी, ता. भोर) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी माहिती दिली. कात्रज परिसरात दोन जण मांडुळ या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस नाईक श्रीकांत वाघवले व इरफान मोमीन यांना मिळाली होती.  त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनरक्षक स्वाती खेडकर व संभाजी धनावडे यांना याची माहिती कळविली. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, आणि त्यांच्या पथकाने कात्रज चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची तपासणी केली असताना त्यामध्ये १ किलो ५०० ग्रॅम आणि १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे दोन मांडुळ आढळून आले.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पकंज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, इरफान शेख, सचिन जाधव, तुषार खडके, हवालदार रिजवान जिनेडी, उमेश काटे, प्रकाश लोखंडे, राजू पवार, अशोक माने, महेबुब मोकाशी, राजाराम सुर्वे, सुभाष पिंगळे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांनी केली आहे.राजू शिळीमकर हा शेतकरी आहे. गणेश वाफगावकर हा पदवीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून शिळीमकर यांच्या शेतात त्यांना दोन मांडुळ सापडले होते. त्यांची विक्री केल्यास भरपूर पैसे मिळतील, हे समजल्याने पैशाच्या आशेने दोन्ही मांडुळ घेऊन ते पुण्यात ग्राहकांचा शोध घेत होते. अमावस्येच्या दिवशी मांडुळे घरात ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते, तसेच जमिनीमध्ये दडवून ठेवलेले गुप्तधन बाहेर येते, अशी लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे़ या मांडुळांची बाजारात ५० लाख रुपये किंमत आहे़ पण, त्यांची विक्री होण्यापूर्वीच ते दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले.

टॅग्स :Puneपुणे