शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंजन माशांची करामत न्यारी, घर बनवतात शिंपल्यावानी !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:40 IST

आपल्या डोळ्यांत अंजन घातल्यावर जशी आग होते, तशी या माशांच्या चावा घेतल्याने होते.

मधमाशांच्या या कर्दनकाळ; मध करू शकत नाहीत तयार

पुणे : मधमाशांचे पोळ अनेक ठिकाणी दिसते, पण अंजन माशीचे क्वचित पहायला मिळते. परंतु, मधमाशी आणि अंजन माशी यामध्ये खूप फरक आहे. मधमाशा मध तयार करू शकतात, पण या अंजन माशा करू शकत नाहीत. उलट मधमाशांसाठी या अंजन माशा धोकादायक आहेत. कारण मधमाशा, मुंग्या हेच यांचे भक्ष्य आहे. भुकूम गावातील एका घरामागे उंबराच्या झाडावर हे घर बनवले आहे. अतिशय सुंदर असे डिझाइन असले, तरी त्यांचे वागणे आणि चावा अतिशय वेदनादायी असा आहे.

काळ्या-पिवळ्या रंगाच्या या अंजन माशा असतात. यांची कॅालनी सुमारे १० हजार माशांची असू शकते, तर मधमाशांची ७५ हजारच्या जवळपास असते.  सर्वसाधारण मधमाशीपेक्षा आकाराने मोठी असलेली अंजन माशी ही मधमाशी, मुंग्या अशा छोट्या किटकांना खाऊन टाकतात. यांचा चावा अतिशय वेदनादायी असतो. या माशीने चावा घेतल्यानंतर दोन-तीन दिवस त्रास सहन करावा लागतो. तसेच त्वचेला खड्डा पडल्यासारखे होते. एखाद्या झाडावर त्या आपले लंबाकृती घर तयार करतात. त्यामध्ये विविध कप्पे करून राहतात. दिवसभर बाहेरून खाद्य आणून सायंकाळी त्या घरात राहतात. झाडावरील साल आणि डिंकाने त्या त्यांच्या घरावर शिंपल्यासारखे डिझाइन तयार करतात. कोणताही किटक त्यांच्याकडे गेला की, त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे घराशेजारी यांचे घर असेल, तर ते धोकादायक ठरते, असे मधमाशा अभ्यासक विजय महाजन यांनी माहिती दिली.  

या माशांचा मधमाशांपेक्षा मोठा आकार असतो. इंग्रजीत याला wasp  म्हणतात. आपल्या डोळ्यांत अंजन घातल्यावर जशी आग होते, तशी या माशांच्या चावा घेतल्याने होते. म्हणून त्यांना अंजन माशी असे म्हटले जाते.- विजय महाजन, मधमाशा अभ्यासक  

टॅग्स :Puneपुणे