शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचा आदेश धुडकावणे पडणार चांगलेच महागात; बारामती पोलीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 19:38 IST

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत दिलेला आदेश धड्कावून लावण्याचा प्रकार बारामतीतच उघडकीस आला होता. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते. या प्रकारानंतर सर्वच स्तरातून प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात होती. आता मात्र बारामती पोलिसांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून कोरोना नियम धाब्यावर बसवत गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते . कोरोनाच्या नियमांचा सर्वांनाच विसर पडल्याचे चित्र आहे.

याबाबत बारामती पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, सोमेश्वर कारखाना निवडून अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये गर्दी करणाऱ्याची माहिती घेतली जात आहे. माहिती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

 

अजित पवारांनी काय दिला होता इशारा...

बारामतीत झालेल्या कार्यक्रमात कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले होते. कोरोनाची भीती संपल्यासारखे अनेकजण मास्क न वापरता वावरत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर्सचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या,असा इशारा देखील पवार यांनी दिला होता.

.......मास्क न वापरल्याप्रकरणी ८० जणांवर दंडात्मक कारवाई सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.लोकशाहीमध्ये अर्ज भरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.त्यामुळे आपण कोणाला रोखु शकत नाही.मात्र, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन १०० रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता तो दंड प्रत्येकी ५०० रुपये करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांकडेच पावती पुस्तक देण्यात आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर पोलीसांनी सांगितले.

 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस