Ajit Pawar Funeral : सावलीसारखा सोबत असलेला अंगरक्षक ढसाढसा रडला; अजितदादांना अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:35 IST2026-01-29T20:35:24+5:302026-01-29T20:35:50+5:30

अजित पवार यांना दीर्घकाळ सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिस अधिकारी व जवानांवर या घटनेचा विशेष आघात झाला.

Ajit Pawar Funeral Security guard emotional on beloved leader's last journey; Ocean of tears in Baramati | Ajit Pawar Funeral : सावलीसारखा सोबत असलेला अंगरक्षक ढसाढसा रडला; अजितदादांना अखेरचा निरोप

Ajit Pawar Funeral : सावलीसारखा सोबत असलेला अंगरक्षक ढसाढसा रडला; अजितदादांना अखेरचा निरोप

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. बुधवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघाती निधनानंतर गुरुवारी बारामतीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी ठीक १२ वाजून ८ मिनिटांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित लाखो कार्यकर्ते, समर्थक आणि बारामतीकरांच्या डोळ्यांतून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ‘लाडक्या नेत्याचा’ अखेरचा निरोप घेताना संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता.



सुरक्षा रक्षक भावूक; डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला

अजित पवार यांना दीर्घकाळ सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिस अधिकारी व जवानांवर या घटनेचा विशेष आघात झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक सुरक्षा रक्षक स्वतःला सावरू शकले नाहीत. काही जवानांनी थेट जय पवार यांच्या गळ्यात पडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांचा आपल्या सहकाऱ्यांवर आणि सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांवर विशेष जिव्हाळा होता. वर्षानुवर्षे ज्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली, त्या नेत्याच्या अकाली जाण्याने सुरक्षा रक्षक मानसिकदृष्ट्या कोलमडले. पार्थिव चौथऱ्यावर ठेवताच अनेक जवान भावनाविवश झाले आणि दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. बारामतीसह संपूर्ण राज्यातून आलेल्या नागरिकांनी ‘नेते म्हणून नव्हे, तर आपला माणूस’ म्हणून अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला.

Web Title : अजित पवार का अंतिम संस्कार: सुरक्षाकर्मी रोए, अंतिम विदाई दी

Web Summary : अजित पवार के आकस्मिक निधन से महाराष्ट्र स्तब्ध है। बारामती में राजकीय सम्मान के साथ उनका अंतिम संस्कार किया गया। उनके बेटों ने चिता को अग्नि दी और शोककर्ता रो पड़े। सुरक्षाकर्मी, जो वर्षों से उनकी रक्षा कर रहे थे, खुलकर रोए, जो उनके देखभाल करने वाले स्वभाव का प्रमाण है।

Web Title : Ajit Pawar's Funeral: Grieving Guard Weeps, Saying Final Farewell

Web Summary : Ajit Pawar's sudden death shocked Maharashtra. He was cremated with state honors in Baramati. His sons lit the pyre as mourners wept. Security personnel, deeply affected, openly grieved the loss of the leader they protected for years, a testament to his caring nature.