शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 14:38 IST

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत.

बारामती: दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात २१३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.तर गेल्या  २४ तासात बारामती परिसरात ३५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.गेल्या अडीच महिन्यात प्रथमच ३० पेक्षा अधिक रुग्ण सापडण्यास १८ फेब्रुवारीपासुन सुरवात झाली आहे. त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढतच आहे.  त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील  कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील २३ आणि ग्रामीणमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ६,६७६ वर पोहोचली आहे. तर ६,२८३ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४५ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. विशेष पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली आहे. प्रत्येक चौकात असे नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत. आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडुन ५०० रुपये दंड आकारण्यास सुरवात झाली आहे. त्यातूनही काही महाभाग विनामास्क फिरताना दिसतात. नगरपालिका प्रशासनाने मास्क शिवाय दुकानात प्रवेश करू नये, असे फलक शहरातील प्रत्येक दुकानावर लावले आहेत. मात्र, दुकानांमध्ये येणाऱ्या  काही उदासीन नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचा धोका स्पष्ट आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू