शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

Rohit Pawar: आयकर विभागाची कारवाई राजकीय हेतूनेचं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 1:17 PM

आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील

बारामती: उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी अशी छापेमारी केली जात असेल तर ही चुकीची बाब आहे. आपल्या कुटूंबीयांना त्रास होत असेल तर ही गोष्ट कोणालाही आवडत नाही. आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 

बारामती येथे रविवारी एका कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील आयकर विभागाची छापेमारी कोणावरही होत असते. मात्र कुटूबियांना त्रास दिला जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ही छापेमारी उगीचच त्रास देण्याच्या हेतूने नसावी. सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. केंद्राकडून अपेक्षीत निधी मिळत नसताना महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू, असा शब्द दिला आहे. राज्यसरकारमधील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी असा शब्द देते तेंव्हा कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मला वाटतो. 

बोटीवर १०० - १५० मुलामुलींपैकी ठराविक लोकांनाच का पकडले, रोहित पवारांचा सवाल 

आर्यन खान (aryan khan) ड्रग्स् प्रकरणावर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ग्रामविकास मंत्री नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडला तो आधी समजून घेतला पाहिजे. ज्या बोटीवर शंभर दिडशे मुलेमुली होत्या त्यातील ठराविक लोकांनाच का पकडले. इतरांना कशाच्या आधारावर सोडले. तसेच या प्रकरणी कारवाई करतान भाजपचे पदाधिकारी कसे काय उपस्थित होते, असे प्रश्न कोणाही सर्वसमान्य नागरिकाला पडणार. ड्रग्स् घेणारा कोणीही असो कारवाई होत असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला हवा. यातून नेमका काय संदेश देणार आहात, असा सवाल देखील रोहित पवार यांनी यावेळी केला. तसेच नितेश राणे यांना काय म्हणायचे आहे तेच मला कळत नाही, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवार