Join us  

स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:42 AM

Star Pravah : सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर स्टार प्रवाहवर आणखी दोन मालिका दाखल होणार आहे.

सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर स्टार प्रवाहवर आणखी दोन नवीन मालिका दाखल होणार आहे.  येड लागलं प्रेमाचं (Yad Lagla Premacha) आणि थोडं तुझं आणि थोडं माझं (Thoda Tujha Thoda Majha) या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यासाठी दोन मालिका निरोप घेणार आहेत. यात पिंकीचा विजय असो आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकांचा समावेश आहे.

पिंकीचा विजय असो आणि तुझेच मी गीत गात आहे या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यात पिंकीचा विजय असो मालिकेचा शेवटचा महाएपिसोड २६ मे रोजी दुपारी २ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारीत केला जाणार आहे. या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजनने केली आहे. ही मालिका जानेवारी २०२२ पासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेत मुख्य पिंकीची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणेने साकारली होती. मात्र नंतर तिने ही मालिका सोडली. मग तिच्या जागी आरती मोरेची वर्णी लागली.  तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा शेवटचा एपिसोड कधी प्रसारित होणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

नव्या मालिकांबद्दल...स्टार प्रवाह वाहिनीवर येड लागलं प्रेमाचं ही मालिका २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत विशाल निकम, जय दुधाणे, पूजा बिरारी आणि अतिशा नाईक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही  मालिका १७ जूनपासून प्रसारीत होणार आहे. यात शिवानी सुर्वेसोबत मानसी कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

टॅग्स :स्टार प्रवाहआई कुठे काय करते मालिका