Join us  

Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:01 PM

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आता गेल्या ३ दिवसांपासून यात मोठी घसरण झाली आहे.

Gold Price Today: फेडरल रिझर्व्हकडून नुकत्याच आलेल्या मिनिट्सनंतर सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे. व्याजदर दीर्घकाळ चढाच राहील, असे मानले जात आहे. महागाई अपेक्षेप्रमाणे कमी होत नाही. तर गेल्या ३ दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. सोन्यामध्ये २००० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात ९०० रुपये, गुरुवारी १०५० रुपये आणि बुधवारी ५० रुपयांची घसरण झाली होती. 

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३८,४६० रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी चांदीचा भाव ५०० रुपयांनी घसरून ९२,१०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. "अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा मजबूत आर्थिक आकडेवारीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ व्याजदर उच्च ठेवू शकते अशी अपेक्षा यावरून व्यक्त होत आहे," असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी अॅनालिस्ट सौमिल गांधी म्हणाले. 

MCX वर २४५५ रुपयांनी सोनं स्वस्त 

एमसीएक्सवर या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २४५५ रुपयांनी घसरला आणि ७१२५६ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. एमसीएक्सवर चांदी ४७६ रुपयांनी घसरून ९०५४८ रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड २३३४ डॉलर प्रति औंस आणि चांदी ३०.३६ डॉलर प्रति औंस वर बंद झाली. 

२४ कॅरेट सोन्याचा भाव 

आयबीजेए अर्थात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा बंद भाव ७२०३ रुपये प्रति ग्रॅम होता. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७७७० रुपये, २० कॅरेटचा भाव ६४१० रुपये, १८ कॅरेटचा भाव ५८३४ रुपये आणि १४ कॅरेटचा भाव ४६४६ रुपये आहे. ९९९ शुद्धतेच्या चांदीचा भाव ८९७६२ रुपये प्रति किलो होता. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोन्याचे दर अन्य ठिकाणी वेगळे असू शकतात.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय