Join us  

Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?

Hardik Pandya And Natasa Stankovic Latest News : हार्दिक पांड्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:50 PM

Open in App

Hardik Pandya Natasa Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे कळते. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. काही गोष्टी या अफवांना बळ देत असून, यामुळे ते दोघे होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

खरे तर नताशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून तिचे पांड्या हे आडनाव हटवले आहे. हार्दिकला चीअर करताना अनेकदा नताशा मैदानात दिसली आहे. मात्र मागील काही कालावधीपासून ती स्टेडियममध्ये दिसली नाही. त्यामुळेच हार्दिक आणि नताशा यांच्या 'का रे दुरावा' असल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिक आणि नताशा यांचे मे २०२० मध्ये लग्न झाले आणि त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म जुलै २०२० मध्ये झाला. २०२३ मध्ये त्यांनी उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार पुन्हा लग्न केले. हार्दिक पांड्याचे नताशासोबतचे दुसरे लग्नही चर्चेत होते.

हार्दिक-नताशामध्ये का रे दुरावा?

'अहमदाबाद मिरर' ने दिलेल्या माहितीनुसार, अशीही अफवा आहे की घटस्फोटाच्या प्रकरणात हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल. असेही म्हटले जात आहे की, हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचे कारण म्हणजे त्याला घटस्फोटासाठी पैसे उभे करणे आवश्यक होते. मात्र, यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही. हार्दिक आणि नताशा यांच्यात सुरू असलेल्या चर्चांमुळे हे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. 

दरम्यान, हार्दिक पांड्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. त्याला संघाकडून मानधन म्हणून १५ कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीचा भाग होता. गुजरात संघही पांड्याला तेवढीच रक्कम देत असे. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. यासोबतच तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. विविध कंपन्या त्याला जाहिरातीसाठी पैसे देत असतात. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचभारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटीघटस्फोटऑफ द फिल्ड