Join us  

दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:51 AM

दलजीतचा दुसरा पती निखिल पटेलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आता खुलासा झाला आहे.

'इस प्यार को क्या नाम दूँ' या लोकप्रिय मालिकेत अंजली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur)चर्चेत आहे. शालीन भनोतशी घटस्फोट घेतल्यानंतर दलजीतने केनियाच्या निखिल पटेलशी लग्नगाठ बांधली.दलजीतला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि निखिलला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. लग्नानंतर दलजीत नवऱ्यासोबत केनियाला शिफ्ट झाली. पण १० महिन्यातच ती लेकासह भारतात परतली. तेव्हापासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. आता पतीपासून विभक्त झाल्याचं तिचं कारण समोर आलं आहे.

दलजीतच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या वादळ सुरु आहे. दलजीतचा दुसरा पती निखिल पटेलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आता खुलासा झाला आहे. दलजीतने ब्रायडल व्हिडिओ शूट करत एक सूचक कॅप्शन टाकलं. यात तिने लिहिले, 'मुलांसाठी ती शांत राहिली. तिच्या कुटुंबाने तिला कोसळू दिलं नाही. ती थांबली... हे, SN तुलाही मूल आहे का?'

दलजीतची ही सूचक पोस्ट पाहून चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला. 'तू नवऱ्याविरोधात केस करु शकते, महिलांना आपले हक्क माहित असले पाहिजेत' अशी कमेंट एका केली आहे. इतकंच नाही तर दलजीतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, 'तू निर्लज्जपणे सोशल मीडियावर तिच्यासोबत खुलेआम आता दिसत. तुझी पत्नी आणि मुलगा लग्नाच्या १० महिन्यातच परत गेले. अख्ख्या कुटुंबाला मानहानीला सामोरं जावं लागलं. मुलांसाठी तरी थोडा आदर ठेवला पाहिजे. मी मुलांसाठी शांत राहिले. पण तू किमान तुझ्या पत्नीसाठी तरी थोडा आदर ठेवायला हवा होता.'

दलजीत कौर सध्या मुलगा जेडनसह भारतात आहे. ती पुन्हा कामही करत आहे. चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. 

 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकारलग्नघटस्फोट