Join us  

हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:01 AM

'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) रुग्णालयात दाखल.

'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) रुग्णालयात दाखल झाला आहे. सलाईन लावून रुग्णालयातील बेडवर झोपलेला त्याचा फोटो व्हायरल होतोय. मुनव्वरचे चाहते चिंतेत पडले आहेत. त्याच्या एका मित्राने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत त्याच्या तब्येतीची माहिती दिली. कालच मुनव्वरने पुणे पोर्शे अपघातप्रकरणी उपहासात्मक ट्वीट केलं होतं.

मुनव्वर फारुकीचा रुग्णालयातील बेडवर झोपलेला हा फोटो व्हायरल होतोय. त्याच्या मित्राने फोटो शेअर करत लिहिले, 'तुला बळ मिळो, लवकर बरा हो भावा'. या फोटोत मुनव्वरला सलाईन लावली आहे. तो खूपच कमजोर झालेला दिसत आहे. त्याचा फोटो पाहून चाहतेही चिंतेत पडलेत. मुनव्वरसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मुनव्वरची तब्येत खालावण्याची ही पहिली वेळ नाही. मागच्याच महिन्यात त्याला अॅडमिट करण्यात आलं होतं. याची माहिती त्याने स्वत:च सोशल मीडियावर दिली होती. तेव्हा त्याने लिहिले 'लग गई नजर'. सध्या मुनव्वरने यावेळी अद्याप काही माहिती दिलेली नाही.

एका युझरने कमेंट करत लिहिले, 'लवकर बरा हो आम्ही प्रार्थना करत आहोत'. राखी सावंतनेही कमेंट करत लिहिले, 'प्लीज मेरे भाई, लवकर बरा हो. मी सुद्धा आजारी आहे'.

मुनव्वरने लॉकअप सीझन 1 आणि बिग बॉस 17 चं विजेतेपद नावावर केलंय. तसंच तो लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. मात्र त्याच्या कॉमेडीमुळे एकदा त्याला जेलमध्येही जावं लागलं आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉसहॉस्पिटल