शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

एक्सचेंज एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारून 12 हजार अमेरिकन डॉलरची चोरी करणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 8:05 PM

डॉलर मोजण्याच्या बहाण्याने ते ताब्यात घेऊन फॉरेन एक्सेंजच्या एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारायचा....

ठळक मुद्देहैद्राबाद येथून अटक : कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉलरच्या नावाने फसवणूकीच्या घटना

पुणे : अमेरिकन डॉलर पाहिजे असे सांगून फॉरेन एक्सचेंज कर्मचाऱ्याकडून जबरदस्तीने डॉलरची चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट 2 कडून अटक करण्यात आली.  त्याच्याकडून एकूण 12 हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. पुण्याबरोबरच हैद्राबाद येथे देखील आरोपीने डॉलरच्या नावाखाली फसवणूक केल्याचे दिसून आले. यानंतर युनिट 2 ने त्याला हैद्राबाद येथून ताब्यात घेतले.          राहूल किरण गाटीया (वय 31, रा.नेपीयन सी रोड, शांतीनगर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. नोव्हेंबर 2019 मध्ये कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉलरच्या नावाने फसवणूकीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्हयाचा तपास करीत असताना तशाच प्रकारचे गुन्हे त्याने हैद्राबाद येथे केल्याची माहिती युनिट 2 चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप यांना मिळाली. त्यांनी ती युनिट मधील इतर अधिकारी व कर्मचारी यांना देऊन पुढील  तपासाच्या सुचना दिल्या. आरोपीच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीवरुन तो एकच असल्याचा संशय पोलिसांना आला. आरोपी गुन्हा करताना प्रथम बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करत होता. नंतर फॉरेन एक्सेंजमध्ये पाच ते सात हजार अमेरिकन डॉलरची मागणी करुन त्यांना आपल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बोलावत असे. यावेळी तो डॉलर मोजण्याच्या बहाण्याने ते ताब्यात घेऊन फॉरेन एक्सचेंज एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारायचा. व त्याला धक्का देऊन डॉलर घेऊन रुमचा दरवाजा बंद करुन पळुन जात असे.  आरोपीची गुन्हे करण्याची कार्यप्रणाली पाहता तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करेल याची शक्यता गृहीत धरुन पुणे व हैद्राबाद येथील फॉरेन च्या अधिका-यांना सुचना देण्यात आल्या होत्या.  आरोपीने पुन्हा हैद्राबादमध्ये पुन्हा फोनवरुन एका फॉरेन एक्सचेंजमधून 7 हजार डॉलरची मागणी केली. तसेच संबंधित व्यक्तीला सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये डिलीव्हरी देण्यास सांगितले. यावेळी हैद्राबाद पोलिसांनी आरोपी राहुल गाटीया याला सापळा रचून पकडले. त्यानंतर आरोपीस कोरेगाव पार्क येथील गुन्हयात वर्ग करुन ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, प्रतापसिंह शेळके, यशवंत आंब्रे, संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल गायकवाड, चेतन गोरे, स्वप्नील कांबळे यांनी पार पाडली. ..........

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक