बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातून आरोपी निर्दोष; घटनेनंतर साडेपाच वर्षांनी लागला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:20 IST2026-05-12T14:19:47+5:302026-05-12T14:20:09+5:30

१५ वर्षीय पीडित आईसोबत भांडण झाल्याने घरातून निघून गेली होती. ती हरविल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोध घेतल्यानंतर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने सांगितले होते.

Accused acquitted in Bopdev Ghat gang rape case; verdict given five and a half years after the incident | बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातून आरोपी निर्दोष; घटनेनंतर साडेपाच वर्षांनी लागला निकाल

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातून आरोपी निर्दोष; घटनेनंतर साडेपाच वर्षांनी लागला निकाल

पुणे : राज्यासह संपूर्ण देशात गाजलेल्या बोपदेव घाट येथील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातून मोहन फडतरे याच्यासह ५ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा आदेश दिला. फडतरे याच्या वतीने ॲड. राहुल नायर यांनी कामकाज पाहिले. पीडितेने फडतरे याला प्रथमच न्यायालयात पाहिल्याचे सांगितले. तसेच, त्याची ओळख परेड घेण्यात आलेली नव्हती. 

सीसीटीव्ही फुटेज सादर करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नाही. फडतरे हा अपंग असल्याचे नमूद करत त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद ॲड. नायर यांनी केला. त्यांना ॲड. प्रमोद धुळे, ॲड. तेजस सोनार आणि ॲड. दीपेंद्र तुपे यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने पीडितेच्या साक्षींमध्ये तफावत असल्याचे नमूद करत निकाल दिला. याप्रकरणी, ऑक्टोबर २०२० मध्ये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १५ वर्षीय पीडित आईसोबत भांडण झाल्याने घरातून निघून गेली होती. ती हरविल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोध घेतल्यानंतर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने सांगितले होते.

 

Web Title : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार मामला: पांच साल बाद आरोपी बरी

Web Summary : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार मामले में पांच आरोपी सबूतों की कमी के कारण बरी। पीड़िता के बयान में विसंगतियां थीं, और सीसीटीवी फुटेज से संबंधित कानूनी प्रक्रियाओं का पालन नहीं किया गया। मामला 2020 में 15 वर्षीय पीड़िता के लापता होने के बाद दर्ज किया गया था।

Web Title : Bopdev Ghat Gang Rape Case: Accused Acquitted After Five Years

Web Summary : Five accused in the Bopdev Ghat gang rape case acquitted due to lack of evidence. The victim's testimony had inconsistencies, and legal procedures regarding CCTV footage weren't followed. The case was registered in 2020 after the 15-year-old victim went missing.