शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:34 IST

ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनऱ्हे येथील घटना; राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा उपाययोजना करण्याची मागणी

पुणे : टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने ट्रेलरच्या पाठीमागे थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धनाजी ऊर्फ अण्णासाहेब सुखदेव जाधव (वय ३५, रा. वाळेखिंडी, ता. जत, जि. सांगली) व विजयकुमार महादेव काशीद (वय ३९, रा. सोनंद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी दोन मृत व्यक्तींची नावे आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने निघालेला ट्रेलर (एनएल ०१ एल ८६३६) शनिवारी रात्री दोनच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ आला असता, ट्रेलरमध्ये बिघाड झाल्याने गाडी रस्त्यामध्येच बंद पडली. त्यातील चालक धनाजी ऊर्फ अण्णासाहेब सुखदेव जाधव व सहचालक विजयकुमार महादेव काशीद दोघे जण खाली उतरून ट्रेलरच्या पाठीमागे उभे राहून इतर वाहनांना बाजूने जाण्याचा इशारा करीत असताना पाठीमागून आलेल्या टेम्पो (डीएन ०९ एन ९८१८) चालकाचे टेंपोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात थांबलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. 

ह्या अपघातात ट्रेलरच्या पाठीमागे थांबलेले दोघेही चालक चेंगरले गेल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात धडक देणारा टेम्पोचालकही जखमी झाला असून अपघाताची खबर समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके व पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. भरधाव वेगाने वाहन चालवून ट्रेलरला पाठीमागून धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तसेच स्वत:ही जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान होण्यास कारणीभूत झाल्याने टेम्पोचालक मनोजकुमार छोटेलाल यादव (वय ३८, रा. पेल्हार, डोंगरपाडा, ता. पालघर, जि. वसई, मूळ जोनपूर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्याबाबत ट्रेलरचा क्लीनर सागर कांबळे यांनी फिर्याद दिली असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूDhayariधायरी