तरुणाचा खून करुन मृतदेह नदीपात्रात टाकून दिला; तब्बल ६ वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:43 IST2026-04-28T16:43:16+5:302026-04-28T16:43:50+5:30

आरोपींनी या प्रकरणातील फिर्यादीला धमकावून त्याच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी, सोन्याचे कडे, घड्याळ, मोटार असा तीन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता

A young man was murdered and his body was thrown into a river he had been hiding it from the police for 6 years | तरुणाचा खून करुन मृतदेह नदीपात्रात टाकून दिला; तब्बल ६ वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अटकेत

तरुणाचा खून करुन मृतदेह नदीपात्रात टाकून दिला; तब्बल ६ वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अटकेत

पुणे: तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकून पसार झालेल्या आरोपीला खराडी पोलिसांनीअटक केली. खून प्रकरणात आरोपी गेले सहा वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. अलका उत्तम बिल्डिंग, दत्त चौक, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी तेजस हा सराईत असून, त्याच्याविरोधात खडक, शिरुर, मुंढवा, चंदननगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. चंदननगर पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. 

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेलार याचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. याबाबत शेलार याच्या मित्राने फिर्याद दिली आहे. शेलार याच्या खून प्रकरणात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेलार हा खराडीतील एका लाॅजमध्ये थांबला होता. त्या वेळी आरोपी ढेरे आणि साथीदारांनी बाहेर फिरायला जायचे आहे, असे सांगून त्याचा खून केला होता. आरोपींनी या प्रकरणातील फिर्यादीला धमकावून त्याच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी, सोन्याचे कडे, घड्याळ, मोटार असा तीन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी तेजस ढेरे हा पसार झाला होता.

ढेरे हा गेले सहा वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. तो खराडी परिसरात २५ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून एक कार जप्त करण्यात आली. परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र चव्हाण, उपनिरीक्षक राहुल काेळपे, दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, विलास केदारी, साहेबराव गुंडाळे यांनी ही कारवाई केली.

Web Title : पुणे: हत्या कर शव नदी में फेंकने वाला 6 साल बाद गिरफ्तार

Web Summary : पुणे पुलिस ने राहुल शेलार की 2019 में हत्या के आरोप में छह साल बाद एक व्यक्ति को गिरफ्तार किया। आरोपी तेजस ढेरे ने सबूत नष्ट करने के लिए शव को नदी में फेंक दिया। ढेरे को खराड़ी में पकड़ा गया।

Web Title : Pune: Man arrested after 6 years for murder, body dumped.

Web Summary : Pune police arrested a man after six years for murdering Rahul Shelar in 2019. The accused, Tejas Dhere, dumped the body in a river to destroy evidence. Dhere, a history-sheeter, was finally caught in Kharadi.