निमगाव केतकी जवळ भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:19 IST2026-04-17T16:18:09+5:302026-04-17T16:19:28+5:30

टेम्पो चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून मोटारसायकलला धडक दिली

A speeding tempo hit a two wheeler near Nimgaon Ketki A 20-year-old youth died on the spot one person was seriously injured | निमगाव केतकी जवळ भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

निमगाव केतकी जवळ भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

निमगाव केतकी: निमगाव केतकी (ता. इंदापूर) हद्दीत व्याहाळी रस्त्यावर भरधाव टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये गणेश सतीश बिबे (वय २०, रा.गौतंडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवाजी शंकर इवरे (वय ३८, रा. गोतंडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलत मेव्हणे गणेश सतीश बिबे (वय २०, रा. गोतंडी) व त्याचा मित्र ज्ञानदेव अशोक भोंग (वय २८, रा. निमगाव केतकी) हे दोघे १५ एप्रिल रोजी सकाळी दुचाकीवरून व्यहळीकडे जात असताना टेम्पो चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये गणेश बिबे याचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानदेव भोंग हा गंभीर जखमी झाला.या प्रकरणी चालक निलेश नंदकुमार तांदळकर (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार गोरवे करीत आहेत.

Web Title : निमगांव केतकी: तेज रफ्तार टेम्पो ने युवक को कुचला, एक घायल

Web Summary : निमगांव केतकी के पास, एक तेज रफ्तार टेम्पो ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे 20 वर्षीय गणेश बिबे की मौत हो गई और एक अन्य गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस ने टेम्पो चालक नीलेश तांदलकर के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Nimgaon Ketki: Speeding Tempo Kills Youth, Injures One in Accident

Web Summary : Near Nimgaon Ketki, a speeding tempo collided with a motorcycle, killing 20-year-old Ganesh Bibe and seriously injuring another. Police have registered a case against the tempo driver, Nilesh Tandalkar, for reckless driving.