शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर जखमी झालेल्या तरुणीला स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेले; विजय शिवतारेंची अपघातग्रस्तांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:27 IST

विजय शिवतारे यांनी अपघातग्रस्तांना स्वतःची गाडी थांबवून मदत केली, गंभीर जखमी झालेल्या तरुणीला स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेले

पुणे: छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती त्यांच्या जन्मस्थळी अर्थातच पुरंदर किल्ल्यावर आज तीनशे अडुसष्ठावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्तानं पुरंदर किल्ल्यावर शंभू प्रेमींनी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. किल्ल्यावर आज शासकीय जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली. उद्योगमंत्री उदय सामंत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी स्थानिक आमदार विजय बापू शिवतारे आदी उपस्थित होते. यावेळी अपघातात जखमी आलेल्या तरुणीला विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले. 

पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॅप्टर पर्यंत आशिष शेलार यांना सोडून विजय शिवतारे परत सासवडकडे जात होते. सासवड नसरापूर या मार्गावर दुचाकीचा अपघात झाला होता. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अपघातग्रस्तांना स्वतःची गाडी थांबवून मदत केली.  या अपघातात एका तरुणी गंभीर जखमी झाली होती. या जखमी तरुणीला विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले.

सकाळपासूनच संख्येनं शंभूप्रेमी, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं आज पुरंदर किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला. हजारोंच्या संख्येनं आलेल्या शंभू प्रेमींनी आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. मागील सोळा वर्षांपासून पुरंदर किल्ल्यावर पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. आता शासनाच्या वतीनं सुद्धा संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरVijay Shivtareविजय शिवतारेMLAआमदारAccidentअपघातChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज