सप्टेंबरअखेर राज्यात डेंग्यूचे ९ हजार ७२८ रुग्ण; बृहन्मुंबई सर्वाधिक, मात्र 'ही' बाब दिलासादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:43 IST2025-10-07T09:43:37+5:302025-10-07T09:43:55+5:30
प्रशासनाकडून उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी, टॉमिफॉस अळीनाशक फवारणी आणि पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडून डास अळींची वाढ थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहे

सप्टेंबरअखेर राज्यात डेंग्यूचे ९ हजार ७२८ रुग्ण; बृहन्मुंबई सर्वाधिक, मात्र 'ही' बाब दिलासादायक
पुणे: राज्यात डेंग्यू तापाचा फैलाव वाढत असून, यावर्षी सप्टेंबरअखेरीस तब्बल १९ हजार ३८५ रुग्ण आढळले आहेत. मात्र, मृत्यूची संख्या घटल्याची बाब दिलासादायक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रण मोहिमेला गती दिली आहे. यावर्षी ३० सप्टेंबरअखेर राज्यात १.५२ लाखांहून अधिक रक्तनमुने तपासले गेले असून, त्यापैकी १९,३८५ डेंग्यू सकारात्मक नमुने आढळले आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद दिलासादायक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत डेंग्यूचे १५,२३९ रुग्ण आढळले होते तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला होता.
डेंग्यू नियंत्रण मोहिमेअंतर्गत फिजिशियन व वैद्यकीय अधिकारी यांना नवीन उपचारपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले गेले आहे. जिल्ह्यात १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यूदिन साजरा करण्यात आला तर जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून आरोग्य विभागाकडून विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. ऑगस्ट महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष डेंग्यू जागृती मोहीमही घेण्यात आली. या आजाराचे तीन प्रकार असून साधा डेंग्यू ताप, रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम यापैकी शेवटचे दोन प्रकार गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यात मृत्यूचा धोका अधिक असतो.
डेंग्यू नियंत्रणासाठी कृती आराखडा
राज्यात आरोग्य कर्मचारी, सेविका आणि आशा कार्यकर्त्यांमार्फत तापग्रस्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेऊन एनआयव्ही, पुणे आणि राज्यातील ५० सेंटिनल केंद्रांमध्ये तपासणी केली जाते. उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी, टॉमिफॉस अळीनाशक फवारणी आणि पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडून डास अळींची वाढ थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील डेंग्यू रुग्णांची आकडेवारी
जिल्हानिहाय स्थिती
बृहन्मुंबई मनपा : ३,७०३
पुणे जिल्हा : ३२५ रुग्ण
नाशिक : १४७
ठाणे : १२१
अकोला : २४५
कोल्हापूर : ११२
नागपूर मनपा : १२९