शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

६२ गुन्हेगार अटक, २ पिस्तूल, १४ कोयते, २ तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गेल्या काही महिन्यात चौथ्यांदा कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. ...

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गेल्या काही महिन्यात चौथ्यांदा कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यात विविध कारणावरून तब्बल ६२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, १४ कोयते, २ तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच एका आरोपीकडून २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई केली. या दरम्यान, एकूण १३८ गुन्हेगार तपासण्यात आले. त्यापैकी ८० गुन्हेगार मिळाले. प्रतिबंधक कारवाईच्या एकूण ३३ केसेस करून ३३ गुन्हेगारांना अटक करून त्यांचेकडून एकूण १ लाख ८३ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तर १४ कोयते, २ तलवारी बाळगणाऱ्या १६ जणांना अटक केली आहे. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात वावरणार्‍या ५ तडीपारांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला असून यावेळी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून २६ हजार ६६५ चा माल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या दारू विक्री करताना सापडल्याने दोघांना अटक करण्यात आली.

चतु:श्रृंगी, कोथरूड, वानवडी, हडपसर पोलीस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एकूण ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना संबंधीत पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

शहरात यापुढेही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.