शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री करणार्‍या २३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:42 IST

गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी  विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन मद्य विक्री करणार्‍यांवर छापे टाकले.

ठळक मुद्दे३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा गांजा, चरस व इतर माल जप्त

पुणे : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू केली असताना शहरात विविध ठिकाणी मद्य विक्री करणार्‍या २३ जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थ विक्री करणार्‍या दोघांना अटक करुन ३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा गांजा, चरस व इतर माल जप्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे. असे असताना अनेक ठिकाणी चोरुन अवैद्यरित्या दारु विक्री केली जात असल्याचे आढळून आले. अनेक नागरिक त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन त्याची माहिती देत होते. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी  विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन मद्य विक्री करणार्‍यांवर छापे टाकले.हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड रोड, कोंढवा, फरासखाना, मुंढवा, विमानतळ,सहकारनगर, लष्कर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली असून त्यात २२ गुन्हे दाखल करण्यात येऊन २३ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ४९ हजार रुपयांचे मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर दोन गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ७ हजार रुपयांचा गांजा व ३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा चरस व इतर माल जप्त केला आहे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसliquor banदारूबंदीArrestअटक