शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:55 IST

किती नगरसेवक आमदार होणार हे लवकरच निश्चित होईल....

ठळक मुद्देयुती-आघाडीमध्ये अनेकचे स्वप्न मात्र भंग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवारी देताना महापालिकेच्या नगरसेवकांचा विचार

पुणे : विधानसभा निवडणुकी सेभा-भाजपची युती आणि काँगे्रस- राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी अखेर निश्चित झाली आहे. यामुळे शहरातील अनेक नगरसेवकांचे आमदार होण्याचे स्वप्न भंग पावले असले तरी आघाडी-युतीमध्ये सुमारे डझनभर नगरसेवक यंदा आमदारकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये भाजपने आठही मतदार संघातील उमेदवार जाहीर केले असून, यापैकी तीन जागांवर महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवारी देताना महापालिकेच्या नगरसेवकांचा विचार केला आहे.

    विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे बहुतेक सर्व पक्षांकडून उमेदवा-या निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या वतीने शहरातील आठ ही विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत. यामध्ये शहराच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे, अश्विनी कदम, सचिन दोडके, सुनिल टिंगरे याना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर मनसेचे गटनेते वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कसब्यातून काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रविंद्र धंगेकर यापैकी एकाला तिकटी मिळण्याची शक्यता आहे. तर पर्वती मतदार संघातून काँगे्रसचे ज्येष्ठ सदस्य आणि नगरसेवक आबा बागुल तीव्र इच्छुक आहेत. परंतु आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वती राष्ट्रवादीच्या वाट्याला पर्वती मतदार संघ आल्याने बागुल काय भूमिका घेणार याकडे सवार्चे लक्ष लागले आहे. यामुळे यापैकी किती नगरसेवक आमदार होणार हे लवकरच निश्चित होईल.-----------------यांचे स्वप्न भंगलेभाजपच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवकांना गेल्या दोन अडीच वर्षांपासूनच आमदारकीची स्वप्न पडू लागली होती. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. यामध्ये कोथरुड मतदार संघातून तीव्र इच्छुक असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सुशिल मेंगडे, पर्वती विधानसभा मतदार संघातून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, हडपसर मतदार संघातून उमेश गायकवाड, कसबा मतदार संघातून हेमंत रासणे, धीरज घाटे, नगरसेवक मारुती तुपे तीव्र इच्छुक होते. भाजपच्या वतीने या इच्छुक उमेदवारांचे महापालिकेत विविध पदे देऊन पुनर्वसन करण्याची शक्यता व्यक्त केली जाते.                                                                                                                             

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMLAआमदारElectionनिवडणूकPoliticsराजकारण