शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:11 IST

ठाण्यातील सॅटिस पुलावर पुणे-वसई शिवशाही बसने घेतला पेट; क्षणात होत्याचे नव्हते, १४ प्रवासी सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: ठाण्यातील सॅटिस पुलावर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट (पुणे) ते वसई या शिवशाही बसला आग लागली. यात अनेक प्रवाशांनी सोबत आणलेले साहित्य खाक झाले. त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. वसईला लग्नासाठी निघालेल्या अलका काळडोके यांच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या ३० साड्या,  ६० हजार रुपयांची रोकड काही सेकंदात डोळ्यांसमोर जळून खाक झाली आणि  साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत. काळडोके यांच्यावर  लग्नसोहळ्याची जबाबदारी होती. दाेन दिवसांवर आलेल्या लग्नसोहळ्यासाठी आता काय घेऊन जाणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

या बसमध्ये चिंचवड येथून सकाळी ९ वाजता अलका काळडोके आणि त्यांचे पती सदानंद वसईला विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. २५ आणि २६ एप्रिल राेजी घरात लग्न असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होते. काही वेळात ठाण्याहून वसईला पोहचू या विचारात असताना बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे समजताच  बसचालक, वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधील १४ प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. दरम्यान, आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांच्या बॅगा जळून खाक झाल्या.

सर्व प्रवाशांसोबत काळडोके याही जीव वाचविण्यासाठी तत्काळ बसमधून खाली उतरल्या. त्यांच्या समोर आग आणि धूरच धूर दिसत होता. या सर्व गोंधळात कुणालही बसमधील सामान सोबत घेताच आले नाही. आग आटोक्यात आणल्यावर सामानाची, बॅगची शोधाशोध केली. जळालेल्या साडीचा अर्धाच तुकडा हाती लागले,’ असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :fireआगthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र