१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:53 IST2026-05-08T10:52:14+5:302026-05-08T10:53:39+5:30

मुलीने आरडाओरड करत सुटका करून घेत कुटुंबियांना माहिती दिल्यामुळे अनर्थ टळला

10-year-old girl lured with chocolate; shopkeeper attempts to rape her, incident in central Pune | १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

पुणे : नसरापूर, पर्वती आणि थेऊर चिमुरडीवरील अत्याचारांच्या घटना ताज्या असताना शहराच्या मध्यवर्ती परिसरातील गणेश पेठेत एका ४७ वर्षीय दुकानदाराने १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी (दि. ७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. मुलीने आरडाओरड करत सुटका करून घेत कुटुंबियांना माहिती दिल्यामुळे अनर्थ टळला. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सोनुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरूवारी (दि. ७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी परिसरातील दुकानदाराने मुलीला चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून बोलवून घेतले. त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड करत स्वतःची सुटका पळ काढला. या घटनेची माहिती तिने आजीला दिली. त्यानंतर कुटुंबियांनी फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title : पुणे: 10 वर्षीय लड़की से छेड़छाड़ का प्रयास, दुकानदार गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक 47 वर्षीय दुकानदार को 10 वर्षीय लड़की को चॉकलेट का लालच देकर यौन उत्पीड़न का प्रयास करने के आरोप में गिरफ्तार किया गया। लड़की भाग गई और परिवार को बताया, जिसके बाद पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Pune Shopkeeper Arrested for Attempting Assault on 10-Year-Old Girl

Web Summary : A 47-year-old shopkeeper in Pune was arrested for attempting to sexually assault a 10-year-old girl by luring her with chocolate. The girl escaped and reported the incident to her family, who alerted the police. The accused has been booked under POCSO Act.