शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळ्या गोळीबार; बिहारमध्ये सत्ताधारीच असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 13:30 IST

firing on Bjp leader in Bihar: हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ भाजपाचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोर शमशी येण्याची वाट पाहत होते. 27 जानेवारीच्या सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे.

मुंगेर : बिहारमध्ये अराजकता पसरू लागली असून आज सकाळी 11.30 च्या सुमारास सत्ताधारी भाजपाच्या नेत्याला दिवसाढवळ्या लोकांसमोर गोळ्य़ा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंगेर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नितीश कुमार यांच्या सुशासनावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ भाजपाचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोर शमशी येण्याची वाट पाहत होते. 27 जानेवारीच्या सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे. शमशी यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना पटन्याला नेण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. 

भाजपाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शमशी यांना एक गोळी लागली आहे. भाजपाच्या मुख्यालयामध्ये एक कार्यक्रम होता. शमशी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच डीजीपी एस के सिंघल यांच्यासोबत चर्चा करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

शमशी हे मुंगेरच्या जमालपूर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. घटनेच्यावेळी ते त्यांच्या गाडीने कॉलेजलाच जात होते. ते गेटवर पोहोचताच त्यांनी चालकाला गाडी तिथेच पार्क करण्यास सांगितले. तेवढ्यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. शमशी हे जमिनीवर पडल्याचे त्यांच्या चालकाने पोलिसांना सांगितले. 

हल्लोखोरांनी शमशी यांच्या कानाखाली, चेहऱ्य़ावर गोळी झाडली. दोन पैकी एक गोळी त्यांना लागली आहे. त्यांची हालत गंभीर असल्याचे सांगितले जात असून उपचारासाठी पटन्याला घेऊन जाण्याची तयारी सुरु आहे.  घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाFiringगोळीबार