शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

महाआघाडीचा नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 6:18 AM

Bihar Election Result: हे कठपुतळी सरकार आहे. राज्यकर्त्यांनी जनादेश बदलवून टाकला आहे, असे ट्विट राजदने केले आहे.

पाटणा : राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीने (महागठबंधन) सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. या निवडणुकीतील जनादेश रालाेआच्या विरोधात होता. बनावट मार्गाचा अवलंब करून तो बदलविण्यात आल्याचा आरोपही महाआघाडीने केला आहे. राजदसह काँग्रेस, भाकप (माले), भाकप, माकप यांचा महाआघाडीत समावेश आहे. नितीशकुमार यांनी राजभवनात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

हे कठपुतळी सरकार आहे. राज्यकर्त्यांनी जनादेश बदलवून टाकला आहे, असे ट्विट राजदने केले आहे. बेरोजगार युवक, शेतकरी, कंत्राटी कामगार आणि शिक्षकांनी आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, असा सवाल केला आहे. रालोआच्या बनवेगिरीमुळे लोक संतप्त आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांच्या बाजूने उभे आहोत, असेही  ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजदने ७५ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. दोन असहाय पक्षाच्या मदतीने स्थापन झालेले हे असहाय सरकार आहे. मुख्यमंत्री कमकुवत, आळशी आणि भ्रष्ट आहेत. ज्येष्ठ पक्ष असलेल्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. बहुमतात येण्यासाठी या पक्षाने बनावट मार्गाचा अवलंब केला आहे. जनतेने राजदला पाठिंबा दिलेला आहे. तेजस्वी यादव हे बिहारमधील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत, असेही ट्विुटमध्ये नमूद आहे. 

या शपथविधीवर आम्ही बहिष्कार घातला आहे. आम्हाला शपथविधीचे  निमंत्रण  मिळालेले नाही.  मिळाले तरी मी  किंवा माझ्या पक्षाचे कुणी सहभागी होणार नाही.- मदनमोहन झा,  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.

आम्ही रालोआविरुद्ध लढत देत आहोत. त्यामुळे शपथविधीत सहभागी होऊ शकत नाही. भाकप आणि माकप या मुद्याबाबतही महाआघाडीसोबत असेल.- कुणाल, राज्य सचिव            भाकप (माले).

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक