शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

By बाळकृष्ण परब | Updated: January 15, 2021 16:47 IST

Sanjay Raut News : एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देकाचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नयेएखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईलशीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो

मुंबई - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंवरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपासह विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारू नयेत, असा सल्लावजा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.यावेळी संजय राऊत म्हणाले की,  ''काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईल. शीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो, असा सूचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.तसेच धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांचीही तटस्थपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यापासून शिवसेनेने धनंजय मुंडेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मुंडेंची बाजू घेतली होती. तर आरोप झाले म्हणून धनंजय मुंडे यांना फाशी देणार का असा सवाल, अनिल परब यांनी उपस्थित केला होता.दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे, असे सांगितले. कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करू. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी  टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा