शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 07:52 IST

Dhananjay munde News: शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती. 

मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. 

कोअर कमिटीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित होते. शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती. 

मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला रेणू शर्मा ही इतर काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी संपर्क करत होती. भाजपासह काही नेत्यांनी अशाप्रकारचे आरोप केले आहेत. तसेच तिचा जबाब, मुंडेंचा जबाब पोलिस नोंदविणार आहेत. यामुळे एकूणच हा प्रकार संय़शयास्पद असल्याने राष्ट्रवादीनेदेखील सावध भूमिका घेतली असून तूर्तास राजीनामा न घेण्याचा राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाने या बाबतचे वृत्त दिले आहे. 

मुंडे काय म्हणालेले...पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. आता पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील म्हणाले होते. 

शरद पवार काय म्हणालेले...धनंजय मुंडेवरील आरोपांबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शदर पवार म्हणाले की, "धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच न्यायालयात गेले. त्यामुळे न्यायालयाच्या विषयावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार यांनी सांगितलं."धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल," असं पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारRapeबलात्कारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे