MPSC Exam Postponed: ठाकरे सरकारचा सावळागोंधळ; काँग्रेसचं आंदोलन मग MPSC चा निर्णय नेमका घेतला कुणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:28 PM2021-03-11T19:28:00+5:302021-03-11T19:37:13+5:30

Congress Protest Against MPSC Exam Postponed Decision: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली MPSC कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले

MPSC Exam Postponed: Congress Protest, So who took the right decision in Mahavikas Aghadi? | MPSC Exam Postponed: ठाकरे सरकारचा सावळागोंधळ; काँग्रेसचं आंदोलन मग MPSC चा निर्णय नेमका घेतला कुणी?

MPSC Exam Postponed: ठाकरे सरकारचा सावळागोंधळ; काँग्रेसचं आंदोलन मग MPSC चा निर्णय नेमका घेतला कुणी?

Next
ठळक मुद्देपरीक्षा ठरलेल्या वेळी १४ मार्चलाच घ्यावी ही युवक काँग्रेसची मागणी आहे.कफ परेड पोलिसांनी घेतलं युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात मला अंधारात ठेऊन घेतला निर्णय, चौकशी करणार - विजय वडेट्टीवार

मुंबई – राज्यात १४ मार्च रोजी होणाऱ्या MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारविरोधात विद्यार्थी संतप्त झाले, आक्रमक विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत राज्यभरात रस्त्यावर उतरले, पुण्यात सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले, विरोधकांनीही या निर्णयावरुन सरकारवर टीका केली, परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेसनेही या निर्णयाविरोधात निदर्शने केली.

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली MPSC कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. परीक्षा ठरलेल्या वेळी १४ मार्चलाच घ्यावी ही युवक काँग्रेसची मागणी आहे. आंदोलन करणारे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह चिटणीस ऍड.विवेक गावंडे , अमित जाधव,जितेंद्र यादव आणि इतर पदाधिकाऱ्यांना कफ परेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या अघोषित आंदोलनात कसे पोहचले गोपीचंद पडळकर? जाणून घ्या घटनाक्रम

दरम्यान, सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजित तांबे यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही फेरविचार करण्याची मागणी केली, परंतु त्यानंतर MPSC ने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सरकारने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे परिपत्रक काढल्याचं स्पष्ट केले, हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे MPSC परीक्षा निर्णयाचा फेरविचार करावा म्हणणारे विजय वडेट्टीवार यांच्याच खात्याने हे पत्र पाठवल्याचं सांगण्यात आलं आणि हेच मंत्री फेरविचार करावा असा व्हिडीओ पोस्ट करून सांगत आहेत.

“महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणार नाही, मग MPSC परीक्षा का थांबवल्या?”

मला परस्पर न विचारता घेतला निर्णय – विजय वडेट्टिवार

दरम्यान याबाबत माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर निर्णय घेतला आहे, मला याबाबत काहीही माहिती नाही, मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. तर MPSC परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये असंतोष आहे. सरकारशी संपर्क ठेवून योग्य नियोजन करून परीक्षा घेण्याची MPSC प्रमुखांची जबाबदारी होती, त्यांनी ती योग्यरितीने पार पाडली नाही. सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून लवकरच परीक्षेची नविन तारीख जाहीर होईल अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली. 

पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

काँग्रेस नेत्यांचा सरकारच्या निर्णयाला विरोध

MPSCची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत असून त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक अडचण होणार आहे. तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल. तसेच वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत आहे. इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी सरकारला विचारला आहे.

Web Title: MPSC Exam Postponed: Congress Protest, So who took the right decision in Mahavikas Aghadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.