शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:06 IST

Maharashtra Election 2024: शिराळा विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होताना दिसत आहे. स्थानिक समीकरणं या निवडणुकीत महत्त्वाची ठरताना दिसत आहे. 

अशोक पाटील, इस्लामपूर Maharashtra Election 2024: नागभूमी संबोधल्या जाणाऱ्या शिराळा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या लढतीची ऐन थंडीत गरमा-गरम चर्चा सुरू आहे. यावेळच्या निवडणुकीत निष्ठावंत गटांची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा गट आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील ४८ गावांत आमदार जयंत पाटील यांचा गट आहे. 

विरोधी भाजपचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या पाठीशी भाजपचा महाडिक पॅटर्न आहे. त्याच्यासह शाहूवाडी मतदारसंघातील वारणा उद्योगसमूहाचे आमदार विनय कोरे यांनीही देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत निकराची झुंज अपेक्षित आहे.

विधानसभेला हातकणंगले पॅटर्न 

महायुतीतून हातकणंगले लोकसभा पॅटर्न वापरण्याची तयारी सुरू आहे. याउलट महाविकास आघाडीने मतदारांच्या सोयीचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघातील मतदारांचा भाव चांगलाच वधारणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रचारात डोंगरी भागातील बहुतांश ग्रामीण भागाला नाईक यांनी टार्गेट करत सत्यजीत देशमुख यांचा बालेकिल्ला काबीज करण्याची तयारी केली आहे.

काट्याची टक्कर

याउलट सत्यजीत देशमुख यांनी शिराळा शहरासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांत संपर्क सुरू केला आहे. त्यांच्या साथीला भाजपमधील महाडिक बंधू, सी. बी. पाटील आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत. 

वारणा खोऱ्यातील विनय कोरे यांनी भाजपच्या सत्यजित देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्हीही उमेदवार तोडीस-तोड असल्याची मतदारसंघात चर्चा सद्या दिसत आहे. 

तुल्यबळ उमेदवारामुळे लक्षवेधी लढत दिसत असून उमेदवार प्रत्येक गावापर्यंत जाऊन प्रचार करत आहेत. लक्षवेधी लढतीमुळे मतदारांचा भाव वधारला आहे.

नाईक, महाडिकांची भूमिका निर्णायक

सध्या शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. मानसिंगराव नाईक यांना त्यांची किती साथ मिळते. तसेच, भाजपचे सम्राट महाडिक यांची महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना कशी साथ मिळते. यावर दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी