Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग; खानापूर ग्रा. पंचायत जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:23 AM2021-01-18T11:23:37+5:302021-01-18T11:44:56+5:30

Gram Panchayat Election Result: खानापूरमध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती.

Maharashtra Gram Panchayat: Shiv Sena lays mine in Chandrakant Patil's village Khanapur, kolhapur | Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग; खानापूर ग्रा. पंचायत जिंकली

Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग; खानापूर ग्रा. पंचायत जिंकली

googlenewsNext

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडून कोल्हापूरला जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची मागणी करत आहेत. आता ग्राम पंचायत निवडणुकीत त्यांच्याच गावात शिवसेनेने सुरुंग लावला आहे. 


गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी सहा जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. तर काँग्रेसला एक व भाजपाला दोन जागा मिळाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भाजपाप्रणित पॅनेलची सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. अत्यंत अटीतटीने निवडणूक झाली असून ३,३०७ जागांसाठी तब्बल ७,६५७ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांसह समर्थकांच्या नजरा आजच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले. चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले होते. उमेदवारांचे गेले दोन दिवस विजयाची गणिते मांडण्यात गेले आहेत. आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.


मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे
ग्रामपंचायतींच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचा जल्लोष असणार आहे; मात्र गावातून मिरवणूक काढल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यामुळे विजयाचा आनंद काहीसा संयमानेच घ्यावा लागणार आहे.


आतापर्यंत हाती आलेले निकाल...
शित्तुर तर्फ मलकापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर, ९ पैकी ९ जागा जिंकुन शिवसेनेचे वर्चस्व, जनसुराज्य - कॉंग्रेसचे पानीपत
राशिवडे : कोदवडे (ता. राधानगरी) येथील धनाजी पाटील, शिवाजी पाटील, कृष्णात पाटील, तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास आघाडीची सरशी सर्व सात जागांवर विजयी. विष्णू बोडके, रणजीत पाटील, शिवाजी पाटील परिवर्तन आघाडीचा धुव्वा. 
 

Web Title: Maharashtra Gram Panchayat: Shiv Sena lays mine in Chandrakant Patil's village Khanapur, kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.