शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली

By हेमंत बावकर | Updated: October 27, 2020 19:40 IST

Eknath Khadse, Raksha Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती.

जळगाव : एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लगेचच जळगाव भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. 

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली. 

या बैठकीला खासदार येतात का, याकडेच साऱ्यांचे लक्ष होते. मात्र, त्या आल्या नाहीत. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करणे राहिले होते. कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. कार्यकारिणी बनविण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घ्यायचे होते. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू आहे. 

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराने भाजपमध्ये कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही आमदार, खासदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती सापेक्ष पक्ष नाही, असे महाजन यांनी सांगितले. क्षा खडसे अनुपस्थितीवर महाजन यांनी सांगितले की, त्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहाता आले नाही. 

महत्वाचे म्हणजे भाजपामधून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे मुक्ताईनगरला आले होते. येथील  निवासस्थानी रविवारी दुपारी खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले होते. खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते.  तर रक्षा खडसे यांनी ही भाजपात राहणार असल्याचे सांगितले  होते. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJalgaonजळगाव