शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय; मोदींनंतर 'ठाकरे' हाच राष्ट्रीय ब्रँड- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 11:26 IST

Sanjay Raut: country has now accepted the leadership of Maharashtra Thackeray is national brand महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय.

Sanjay Raut: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय. त्यामुळे मोदींनंतर 'ठाकरे' हाच 'राष्ट्रीय ब्रँड' असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे. मोदींनंतर देशाला नेतृत्व देणारं कोण? असं विचार लोकांना पडतो. आज देशाच्या राष्ट्रीय पक्षाला मोठं आव्हान निर्माण करतील अशी ताकद 'ठाकरे ब्रँड'मध्ये आहे. देश आज ज्या संकाटातून जातोय ते पाहता देशाला आज संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. मोदी मोठे नेते आहेतच पण त्यांच्यानंतर कुणी नाही असं होत नाही. उद्धव ठाकरे आज राज्यात कोणतीही आदळआपट न करता शांतपणे उत्तम काम करतायत. ते मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं नव्हतं. पण आज ते ज्या पद्धतीनं काम करतायत ते संपूर्ण देश पाहातोय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील", असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते 'साम' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. Sanjay Raut : country has now accepted the leadership of Maharashtra thackeray is national brand

नेहरु-इंदिरांच्या काळातही ताकदीचे १० नेते होते
"भारत देश हा काही लहान देश नाही. खंडप्राय देश आहे. त्यामुळे केवळ एक नव्हे, अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरांच्या काळतही तितकेच ताकदीचे १० नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे नेहमीच देशाला लाभत असतं. मोदी तर आहेतच पण देशात आज उद्धव ठाकरेसुद्धा ताकदीचं नेतृत्व आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

काँग्रेस स्वबळावर लढणार, मग तु्म्ही काय करणार?
राज्यात काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी केंद्रीय नेतृत्वातून अद्याप तसं काही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही असं म्हणत काँग्रेसच्या स्वबळाची हवाच काढून टाकली. "नाना पटोले यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जातंय की स्वबळावर लढू आणि मुख्यमंत्री बनू, पण त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वानं तसं काही अद्याप कळवलेलं नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांनी जर तसं गो अहेड दिलं असेल तर ते त्यांच्या पक्षाचं धोरण आहे. पण त्यांनी काही अद्याप सांगितलेलं नाही. केंद्रीय नेत्यांकडून तशा काही सूचना आलेल्या नाहीत", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी