CoronaVirus News : "लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 01:53 PM2021-05-01T13:53:38+5:302021-05-01T14:05:07+5:30

CoronaVirus Yogi Adityanath Government And BJP : राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

CoronaVirus News bjp mp and mla upset with yogi government claim of no shortage of beds and oxygen in uttar pradesh | CoronaVirus News : "लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

CoronaVirus News : "लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

Next

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. 

लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कायदेमंत्री बृजेश पाठक हे राज्य सरकारला पत्र लिहिणारे पहिले निर्वाचित सदस्य होते. त्यांनी आपल्या पत्रात लखनऊ प्रशासनाच्या कारभारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. बेड, ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यानं लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. तसेच मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनीही अनेकदा परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचं सांगत त्यांनी सरकारी रुग्णालयांत स्वत: लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. 

"उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू"

कौशल किशोर यांनी निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, त्याचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल पत्रं लिहून कळवलं होतं. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी नकार देत आहेत आणि रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. आठवड्याच्या सुरुवातीला औराई, भदोहीचे भाजपा आमदार दीनानाथ भास्कर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. भदोहीच्या भाजपा जिल्हा सचिवांची कोरोना संबंधीत मृत्यूच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: CoronaVirus News bjp mp and mla upset with yogi government claim of no shortage of beds and oxygen in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.