शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

'ती' गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती, चंद्रकांत पाटलांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:10 IST

BJP leader Chandrakant Patil : इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई : आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) व्यक्त केले. यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात दंगलीवरून (Gujrat riots)  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केले आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअ‍ॅक्शन) होती, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. (BJP leader Chandrakant Patil comments on Gujrat riot)

बुधवारी मुंबईत चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअ‍ॅक्शन म्हणावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना राहुल गांधी यांच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. यावर, आता इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गुजरात दंगल ही चूक होती, असे भाजपा म्हणणार का?नवाब मलिक यांचा सवालराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील गुजरात दंगलीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. 'राहुल गांधींनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी केलेली चूक स्वीकारली. याआधी काँग्रेसनं दिल्लीत झालेल्या दंगलीबद्दलही माफी मागितली आहे. आता नरेंद्र मोदी आणि भाजपा गुजरात दंगल ही चूक होती, असं म्हणणार का?, मोदी आणि भाजपानं गुजरात दंगलीबद्दल देशाची माफी मागावी,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली.

काय म्हणाले राहुल गांधी?कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 

(आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात')

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण