शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

‘आम्ही इच्छुक नाही, परंतु पक्षाने...' लोकसभेच्या उमेदवारीबाबत जगताप कुटुंबीय स्पष्टच बोलले

By विश्वास मोरे | Published: June 28, 2023 1:47 PM

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढविली होती पण खासदार होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेला संधी मिळणार याबाबतची चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदाबाबत प्रक्रिया सुरू आहे का?  आणि बदल होणार आहे का? यावर ‘बदल तर हवाच’, असे सूचक विधान चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत आज केले.

 देशात आणि राज्यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पत्रकार परिषद झाली. सुरूवातीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प आहे, असे जगताप यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर उषा  ढोरे , भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप, विधानसभा संयोजक  मोरेश्वर शेडगे, माजी पक्षनेते नामदेव ढाके,  संतोष कलाटे,  संकेत चोंधे, उज्वलाताई गावडे,  संयोजक शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू यावेळी शहराध्यक्ष निवडीबाबत काही हालचाली सुरू आहेत का? नवीन शहराध्यक्ष निवडले जाणार आहेत याबाबत आमदार जगताप यांनी भूमिका जाहिर केली. त्यातून शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्ष पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले.

संधी दिल्यास जगताप कुटुंबातून उमेदवार

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शंदे गटात प्रवेश केला आहे. तर शिंदे गट पिंपरी-चिंचवडमध्ये अ‍ॅक्टीव्ह झाला आहे. तर  मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाची ताकद अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मावळमध्ये पक्षाची बांधणी सुरू आहे. हा मतदार संघ भाजपाला मिळाला तर तयारी आहे, असे विधान केले होते. तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढविली होती. खासदार होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. लोकसभा मतदार संघ भाजपाला आल्यास जगताप कुटुंबातील उमेदवार असेल का? यावर शंकर जगताप यांनी सुरूवातीस उत्तर देण्याचे टाळले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर जगताप म्हणाले, ‘आम्ही इच्छुक नाही. परंतु पक्षाने निर्णय घेतला तर आमची हरकत नाही. पक्षाचा जो आदेश असेल तो मान्य राहिल.’’

टॅग्स :PuneपुणेLakshman Jagtapलक्ष्मण जगतापBJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा