शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 4, 2025 19:42 IST

भारतीय महिलांच्या १९ वर्षांखालील संघात पिंपरी-चिंचवडच्या ईश्वरी अवसरेचाही समावेश

पिंपरी :महाराष्ट्र संघातून खेळताना माझी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. अंतिम सामन्यातील संयमी खेळ हा निर्णायक ठरला आणि भारतीय संघाने विश्वचषकावर विजयाची मोहोर उमटवली, हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे. त्या क्षणांनी अजूनही मी भारावलेली आहे, अशी भावना भारतीय महिलांच्या १९ वर्षांखालील संघात खेळणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या ईश्वरी अवसरे व्यक्त केली.

भारतीय महिलांच्या १९ वर्षांखालील संघाने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा ९ बळींनी पराभव केला. आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी ८३ धावांचे लक्ष दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान १ बळी गमावून ११.२ षटकांमध्ये पूर्ण केले. या संघात पिंपरी-चिंचवड मधील ईश्वरी अवसरे हिचाही समावेश होता.

लहानपणापासून ईश्वरीला क्रिकेट खेळात रस होता. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून तिला प्रशिक्षक सुनील दिवेकर यांच्या क्रिकेट अकादमीला प्रवेश घेतला. सध्या तिचे कोल्हापूर येथे शालेय शिक्षण सुरू आहे. आई खासगी शाळेत शिक्षिका, तर वडील लष्करात आहेत. लेगस्पिनर, सलामीवीर फलंदाज आणि पार्ट-टाईम विकेटकिपर म्हणून ती एकहाती सामन्यात किल्ला लढविते. दहा वर्षांची असताना तिला सचिन तेंडुलकर यांचे मार्गदर्शनही मिळाले. तसेच तिला सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
 
..अशी आहे ईश्वरीची कामगिरी
ईश्वरी १३ वर्षांची असताना तिची १५ वर्षांखालील महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. भारतात फलंदाजीत नवव्या क्रमांकावर राहिली. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत राज्याकडून खेळताना एकदिवसीय मालिकेत दोन शतकांसह ४८१ धावा केल्या. २०२३-२४ मध्ये टी-२० मध्ये महाराष्ट्राकडून ४ अर्धशतकांसह ३२५ धावा केल्या. या कामगिरीची दखल घेत तिला रोटरी क्लब ऑफ पुणेने प्रोफेसर देवधर पुरस्काराने सन्मानित केले. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात १९ वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये तिची कर्णधारपदी निवड झाली. 

२०१ सामन्यांत ११ शतकांसह ६,६०३ धावा...
भारतीय संघात सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून तिची नोंद झाली. वयाच्या १४ व्या वर्षी राज्य संघात १५, १९ आणि २३ वर्षांखालील व खुल्या श्रेणीतील संघात बीसीसीआयने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेणारी ती एकमेव आहे. देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २८४ धावांसह सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही तिच्या नावावर आहे. १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीसाठी संघात निवड झाली होती, तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही निवड झाली होती. वरिष्ठ महिला एकदिवसीय आमंत्रित स्पर्धेत २७० धावांचा विक्रमही तिच्या नावावर आहे. महाराष्ट्राकडून खेळताना तिने टी-२० सामन्यांत ७५ चेंडूंत १०५ धावांचा विक्रमही तिच्या नावावर आहे. आतापर्यंत तिने २०१ सामन्यांत ६,६०३ धावा केल्या. त्यात ११ शतकांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिला